ठाणे महापालिकेवर मनसेचा आज शेतकरी मोर्चा; मोठ्या संख्येने या... राज ठाकरेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 12:47 AM2019-05-17T00:47:11+5:302019-05-17T00:47:16+5:30

मनसेच्या वतीने १७ मे रोजी ठाणे महापालिकेवर निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे गुरुवारी केले.

MNS today's Farmers Front for Thane Municipal Corporation; A large number of people ... Raj Thackeray appealed | ठाणे महापालिकेवर मनसेचा आज शेतकरी मोर्चा; मोठ्या संख्येने या... राज ठाकरेंचे आवाहन

ठाणे महापालिकेवर मनसेचा आज शेतकरी मोर्चा; मोठ्या संख्येने या... राज ठाकरेंचे आवाहन

Next

ठाणे : मनसेच्या वतीने १७ मे रोजी ठाणे महापालिकेवर निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे गुरुवारी केले. केवळ ठाणे नव्हेच राज्यातील सर्व शहरांमध्ये शेतकºयांसाठी केवळ जागाच नव्हे, तर इतरही सुविधा मिळवून देण्यासाठी मनसे प्रशासनाला भाग पाडणार आहे. बाकी प्रश्नांवर राज्यस्तरावर जे काही करायचे, ते करीनच. तूर्तास याविरुद्ध आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असे राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याने ठाणे शहरात चक्काजाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठामपाने भाजपाच्या तक्रारीवरून आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरून राज यांनी पत्रात म्हटले आहे की, शेतकºयांची सध्याची अवस्था जर सरकारचा एक घटक असणाºया लोकप्रतिनिधींना समजत नसेल, तर त्यांना ताळ्यावर आणणे गरजेचे आहे. केवळ एक शेतकरी आहे म्हणून ही घटना दुर्लक्ष करणे योग्य नाही, तर ही एक प्रातिनिधिक घटना आहे, असे समजून त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे, म्हणूनच शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा निघत आहे.

भाजपाकडून गुंडांचा वापर
शेतकºयांनी एकट्याने असो वा सामूहिकपणे त्याने उत्पादित केलेला माल विकण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे.
त्यासाठी शहरातील सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जागा मिळवून दिली पाहिजे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
शेतकरी बाजारपेठांना मनसेचे कार्यकर्ते सर्वतोपरी मदत करत असताना केवळ श्रेय मिळू नये, यासाठी भाजपाचे पदाधिकारी हे गुंडांकडून अशावेळी प्रशासनावर दबाव आणून शेतकºयांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न करतात, असा आरोप राज ठाकरे यांनी या पत्रात केला आहे.

Web Title: MNS today's Farmers Front for Thane Municipal Corporation; A large number of people ... Raj Thackeray appealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.