17 मे रोजी मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरुद्ध पुकारणार एल्गार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 02:51 PM2019-05-15T14:51:55+5:302019-05-15T17:09:44+5:30

ठाण्यातील आंबा स्टॉल लावण्यावरुन झालेल्या वादानंतर मनसेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाण्यात येत्या 17 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

MNS organise farmer morcha on May 17 in Thane | 17 मे रोजी मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरुद्ध पुकारणार एल्गार 

17 मे रोजी मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरुद्ध पुकारणार एल्गार 

Next

ठाणे - ठाण्यातील आंबा स्टॉल लावण्यावरुन झालेल्या वादानंतर मनसेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाण्यात येत्या 17 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला मनसेचे नेते तसेच राज्यभरातून किमान 5 हजार शेतकरीला उपस्थित राहतील असा विश्वास मनसेचे पालघर आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे. अविनाश जाधव यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. 

यावेळी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, आंबा स्टॉल लावल्याने भाजपा नगरसेवकाकडून सचिन मोरे या शेतकऱ्याला 20 हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे शेतकऱ्याने देण्यास नकार दिल्याने पालिकेकडून या शेतकऱ्याच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. आंबा स्टॉलसाठी परवानगी मागितली असताना ती नाकारण्याचं कोणतंही ठोस कारण महापालिकेकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी येत्या 17 मे रोजी ठाण्यात शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितले. 

या शेतकरी मोर्चासाठी नाशिकहून राहुल ढिकले, पुण्याहून बाबाराजे जाधवराव, मराठवाड्यातून जावेद शेख, कोकणातून वैभव खेडेकर या मनसे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ठाण्यात दाखल होतील. तसेच ठाणे जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी,  ग्रामपंचायत सदस्य मोर्चात सहभागी होतील. या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या मोर्चाला पाठिंबा दिल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितले. 

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून ठाण्यातील विविध मैदानात शेतकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात 18 मे पासून टँकर बंद करण्याचा इशारा देत टँकर माफियाना अभय देण्यासाठी पाणी टंचाई, ठामपाचे पैसे घालवता कुठे? असा सवाल मनसेचे अविनाश जाधव यांनी विचारला आहे. 

मनसेच्या शेतकरी मोर्चातील प्रमुख मागण्या

  • सुमारे आठ ते दहा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी 100  स्टॉल उपलब्ध करावेत. 
  • सचिन मोरे या शेतकऱ्याकडून पैसे मागणाऱ्या भाजपा नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा. 

Web Title: MNS organise farmer morcha on May 17 in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.