भिवंडीत विवाहितेची घरांत हत्या करून पती झाला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:25 PM2018-04-12T21:25:27+5:302018-04-12T21:25:27+5:30

Missing husband killed in Bhiwandi wedding | भिवंडीत विवाहितेची घरांत हत्या करून पती झाला बेपत्ता

भिवंडीत विवाहितेची घरांत हत्या करून पती झाला बेपत्ता

googlenewsNext
ठळक मुद्दे कामतघर मधील इमारतीत पाचव्या मजल्यावर विवाहितेची हत्याविवाहितेचा गळा चिरलेला मृतदेह कुलूप बंद खोलीत मिळाला घटनास्थळी ठसे तपासण्यासाठी ठाणे येथून आले फॉरेन्सीक तज्ञांचे पथक

भिवंडी : शहरातील कामतघर भागात चौधरीं कम्पाऊंडमध्ये रहाणाऱ्या विवाहित महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली असून तीचा पती बेपत्ता झाला आहे.त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला असून पोलीस महिलेच्या पतीचा कसून शोध घेत आहे.
मालती विनोद झा (५२)असे हत्या झालेल्या महिलेचे नांव असून ती आपल्या कुटूंबासह कामतघर येथील चौधरी कंपाऊंडमध्ये अष्टविनायक हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर कुटूंबासह रहात होती. नेहमीप्रमाणे सकाळी मालती मंदिरात गेली तर सासू कौसल्या जवळच्या पार्कमध्ये फिरण्यासाठी गेली होती. दरम्यान कौसल्या घरी परतल्यानंतर आपल्या घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून सून मालतीची वाट पहात शेजा-यांकडे बसून राहिली. एक तास उलटूनही मालती न आल्याने कौसल्याने तीचा नातू प्रकाशला फोन करून बोलाविले. त्याने आपल्याकडील चावीने घराचा दरवाजा उघडला.तेंव्हा त्यास आपली आई मालती हिची गळा चिरून हत्या झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. त्याने ताबडतोब वडील विनोद झा यांना मोबाईल लावला असता त्यांचा मोबाईल घरांतच आढळून आला. शेजा-यांनी या घटनेची खबर नारपोली पोलीस ठाण्यास दिली असता पोलीस पथक घटनास्थळी आले. त्यावेळी घरांतील मुख्य खोलीतील भिंतीवर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्याचे पोलीसांना आढळून आले. परंतु घरातील सर्व मौल्यवान चीजवस्तू जागेवर असल्याने हि हत्या चोरीच्या उद्देशाने केली नसल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले .
या घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सैफन मुजावर यांनी भेट देऊन घरांतील हाताचे ठसे तपासण्यासाठी ठाणे येथून फॉरेन्सीक तज्ञांचे पथक बोलाविले. ते आल्यानंतर घटनेचा पंचनामा करीत पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी रु ग्णालयात रवाना केला आहे. या घटनेनंतर मृत मालती झा ह्यांचा पती विनोद झा हा घरातून बेपत्ता झाला असून तो सायंकाळपर्यंत घरी परतला नव्हता. या हत्ये प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीसांनी तीचा पती विनोद झा याच्यावर संशय व्यक्त केला आहे.

Web Title: Missing husband killed in Bhiwandi wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.