मिरा भार्इंदर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये २५ टक्के कपात करण्याच्या पालिकेच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 08:32 PM2018-01-22T20:32:29+5:302018-01-22T20:32:51+5:30

आरोग्य, वैद्यकिय, उद्यान, आस्थापना, परिवहन आदी विभागातील कार्यरत सुमारे ३ हजार कंत्राटी कर्मचारयांच्या संख्येत तब्बल २५ टक्के इतकी कपात करण्याच्या हालचाली मिरा भार्इंदर महापालिकेच्या प्रशासनाने सुरु केल्या आहेत.

Mira Bharinder Municipal Corporation's 25 percent reduction in contract workers | मिरा भार्इंदर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये २५ टक्के कपात करण्याच्या पालिकेच्या हालचाली

मिरा भार्इंदर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये २५ टक्के कपात करण्याच्या पालिकेच्या हालचाली

googlenewsNext

- धीरज परब
मिरारोड -  मिरा भार्इंदर महापालिकेच्या स्थायी व अस्थायी आस्थापनेचा खर्च तब्बल ६० टक्के पर्यंत पोहचला असून, नियमा नुसार तो महसुली उत्पन्नाच्या ३५ टक्के मर्यादेत असायला हवा. परिणामी पालिकेच्या काटकसरी धोरणा खाली आता आरोग्य, वैद्यकिय, उद्यान, आस्थापना, परिवहन आदी विभागातील कार्यरत सुमारे ३ हजार कंत्राटी कर्मचारयांच्या संख्येत तब्बल २५ टक्के इतकी कपात करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत.

मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य, आस्थापना, वैद्यकिय, उद्यान, परिवहन आदी विभागां मध्ये कंत्राटी पध्दतीने सुमारे ३ हजार कर्मचारी घेतले आहेत. तर पालिकेच्या कायम सेवेतील सुमारे दिड हजार कर्मचारी आहेत. पालिकेच्या सेवेत कायम स्वरुपी कर्मचारयां पेक्षा कंत्राटी पध्दतीने काम करणारया कंत्राटी कर्मचारयांची संख्या जवळपास दुप्पट आहे.

आरोग्य विभागात १३९९ कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत. सदर सफाई कामगार हे ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट या ठेकेदाराच्या माध्यमातुन शहरातील दैनंदिन कचरा व गटार सफाईचे काम करतात.

पालिकेने मुख्यालयासह विविध कार्यालयं, उद्यान, मैदान, स्मशान भुमी आदी ठिकाणी ७१२ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सदर सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम पालिकेने सैनिक सिक्युरीटी ला दिलेले आहे. परिवहन विभागात देखील सुमारे साडेतीनशे कर्मचारी ठेका पध्दतीने घेण्यात आलेले आहेत.

उद्यान विभागात २७५ मजुर तर
आस्थापना विभागात ८० संगणक चालक आहेत. शिवाय वैद्यकिय विभागात डांस निर्मुलनासाठी किटकनाशक फवारणी करणारे १८१ कर्मचारी कंत्राटी पध्दतीनेच घेण्यात आले आहेत.

दुपटीने कंत्राटी कर्मचारी पालिका सेवेत कार्यरत असुन पालिकेचा आस्थापने वरचा खर्च देखील मोठा आहे. त्यामुळे पालिके वरील असणारा कर्जाचा डोंगर, उत्पन्नाचे कमी असलेले स्तोत्र, कामांवर होणारा वाढता खर्च आदींचा लेखा जोखा मांडत प्रशासनाने कंत्राटी कर्मचारयां मध्ये किमान २५ टक्के कपात करण्यात यावी असा पावित्रा घेतला आहे.

या संदर्भात उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. बैठकीत कंत्राटी कर्मचारयांच्या कपाती बद्दल चर्चा करण्यात आली.

त्या अनुषंगाने आरोग्य, आस्थापना, परिवहन, उद्यान, वैद्यकिय आरोग्य या विभागाच्या विभाग प्रमुखांना उपायुक्त मुख्यालय म्हसाळ यांनी पत्रक काढले आहे. स्थायी व अस्थायी कर्मचारयां वरील आस्थापनेचा खर्च ६० टक्के पर्यंत गेला आहे. त्यामुळे २०१५ ते २०१७ दरम्यानच्या कालावधीत कार्यरत कमरचारयांच्या संख्येचा आणि कामाचा अभ्यास करावा. इतकी कामगार वाढ का झाली ? आदी मुद्दे उपस्थित करत सदर विभागाच्या विभाग प्रमुखांना आपल्या स्तरावर २५ टक्के कंत्राटी कर्मचारी कपातीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगीतले आहे.




 

Web Title: Mira Bharinder Municipal Corporation's 25 percent reduction in contract workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.