मध्यमवर्गींयावर सुवर्ण कु-हाड ! ज्वेलर्सचा विरोध : फसव्यांना पळून जाऊ देता मग आम्हालाच वेठीस का धरता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:45 AM2018-02-26T00:45:29+5:302018-02-26T00:45:29+5:30

ज्वेलर्सकडील हमखास परताव्याच्या गुंतवणूक योजना केंद्र सरकार नियमबाह्य ठरवण्याच्या विचारात असले तरी ज्वेलर्सकडील या योजना म्हणजे ठेवी नव्हे तर सर्वसामान्य ग्राहकांची गुंतवणूक आहे.

 The middle class on the golden hoop! Opponent of the Jewels: Let the deception escaped, why do we have to torture? | मध्यमवर्गींयावर सुवर्ण कु-हाड ! ज्वेलर्सचा विरोध : फसव्यांना पळून जाऊ देता मग आम्हालाच वेठीस का धरता?

मध्यमवर्गींयावर सुवर्ण कु-हाड ! ज्वेलर्सचा विरोध : फसव्यांना पळून जाऊ देता मग आम्हालाच वेठीस का धरता?

Next

स्नेहा पावसकर 
ठाणे : ज्वेलर्सकडील हमखास परताव्याच्या गुंतवणूक योजना केंद्र सरकार नियमबाह्य ठरवण्याच्या विचारात असले तरी ज्वेलर्सकडील या योजना म्हणजे ठेवी नव्हे तर सर्वसामान्य ग्राहकांची गुंतवणूक आहे. या योजनांना नियमबाह्यठरवून सरकार केवळ ज्वेलर्सवरच नाही तर सामान्य ग्राहकांवरही अन्याय करणार आहे. नीरव मोदी, चोक्सी अशा फसव्यांना हे सरकार पळून जाऊ देते आणि आता इतरांच्या धंद्यावर गदा आणणार असेल तर ते चुकीचे आहे असा एकमुखी सूर ज्वेलर्स वर्गाकडून लावला आहे.
सोन्यामध्ये गुंतवणूक करणाºयांची संख्या आजही मोठी आहे. लग्नकार्यप्रसंगी मुलींना, मुलांना दागिने भेट दिले जातात. तसेच महिलांमध्ये दागिन्याची क्रेझ कायम आहे. मात्र सोन्याचे दागिने बनवताना एकरकमी पैसे देणे सर्वसामान्यांना शक्य नसते. त्यामुळे भविष्याचा विचार करता सामान्य नागरिक दर महिन्याच्या मिळकतीतून थोडी थोडी रक्कम बाजूला काढून ज्वेलर्सकडे गुंतवतात. वर्षअखेरीस त्या एकूण रकमेत काही अधिक पैसे भरून एखादा दागिना बनवतात. मग अशा ग्राहकांसाठी ज्वेलर्सकडे काही आकर्षक योजना असतात.
११ किंवा १२ हप्ते भरल्यावर त्यावर एक महिन्याच्या हप्त्याची रक्कम किंवा २४ महिने पैसे भरल्यावर पुढील २ महिन्याच्या हप्त्याची रक्कम ज्वेलर्स स्वत: भरतात. शिवाय घडणावळीवर सूट देतात. अशा विविध आकर्षक योजना ठाणे-मुंबईतील सुमारे ५०-६० टक्के ज्वेलर्सकडे गेल्या २० वर्षांपासून सुरू आहेत. सुमारे १००० रूपयांपासून पुढे कितीही पैसे गुंतवले जाऊ शकतात. छोट्या ज्वेलर्सबरोबरच मोठ्या ज्वेलर्सकडेही या योजना सुरू आहेत. या योजनेत जास्तीत जास्त मध्यमवर्गीय ग्राहक विश्वासाने पैसे गुंतवत असतात आणि आजपर्यंत या योजनेत एखादा अपवाद वगळता फसवणूक झालेली नाही. बांधकाम विकासक क्षेत्रातील ठेवी हा प्रकार वेगळा असतो मात्र ज्वेलर्स क्षेत्रातील अशा ठेवी या केवळ ग्राहकांची बचत व्हावी या उद्देशाने सुरू आहेत, असे असे ज्वेलर्सचे म्हणणे आहे.

Web Title:  The middle class on the golden hoop! Opponent of the Jewels: Let the deception escaped, why do we have to torture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं