सक्तीच्या विश्रांतीमुळे मेगाब्लॉक यशस्वी, अतिरिक्त बसगाड्यांमुळेही प्रवाशांची गैरसोय टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 03:59 AM2018-11-19T03:59:02+5:302018-11-19T03:59:18+5:30

ब्रिटीशकालीन पत्रीपूल पाडण्यासाठी रेल्वेने जाहीर केलेल्या मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांनी रविवारी एकप्रकारे सक्तीचीच विश्रांती घेतली. सुटीचा दिवस असला तरी लोकांनी रेल्वे किंवा रस्त्यानेही प्रवास करणे टाळल्याने रेल्वेस्थानकांवर शुकशुकाट होता.

Mega Blocks are successful due to forced rest, avoidance of passenger traffic due to extra buses | सक्तीच्या विश्रांतीमुळे मेगाब्लॉक यशस्वी, अतिरिक्त बसगाड्यांमुळेही प्रवाशांची गैरसोय टळली

सक्तीच्या विश्रांतीमुळे मेगाब्लॉक यशस्वी, अतिरिक्त बसगाड्यांमुळेही प्रवाशांची गैरसोय टळली

Next

कल्याण/ठाणे : ब्रिटीशकालीन पत्रीपूल पाडण्यासाठी रेल्वेने जाहीर केलेल्या मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांनी रविवारी एकप्रकारे सक्तीचीच विश्रांती घेतली. सुटीचा दिवस असला तरी लोकांनी रेल्वे किंवा रस्त्यानेही प्रवास करणे टाळल्याने रेल्वेस्थानकांवर शुकशुकाट होता.
मेगाब्लॉकदरम्यान कल्याण - डोंबिवलीदरम्यानची लोकलसेवा पूर्णत: बंद करण्यात आली होती. या मेगाब्लॉकची पूर्वकल्पना असल्यामुळे लोकांनी रविवारी घराबाहेर पडणेच टाळले. रविवार असल्यामुळे तशीही प्रवाशांची गर्दी कमीच असते. त्यातही मेगाब्लॉक आल्याने बदलापूर रेल्वे स्थानकावर शुकशुकाट पसरला होता. या मेगाब्लॉकमुळे ठाण्यात थोड्याफार प्रमाणात प्रवाशांचे हाल झाले. ठाणे रेल्वेस्थानकात सकाळच्या वेळी धीम्या मार्गावर प्रवाशांची गर्दी होती. एक्स्प्रेसचे फलाट मात्र रिकामे होते. ब्लॉकची पूर्वकल्पना असल्याने नागरिकांनी कल्याणपर्यंतचा प्रवास टाळल्याचे दिसून आले. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे आणि एसटी विभागाने जादा गाड्या सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मेगाब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली होती. हा मेगाब्लॉक डोंबिवली ते कल्याणदरम्यान घेण्यात आला. सीएसएमटी ते डोंबिवली आणि कल्याण ते कर्जत-कसारा या मार्गांवरील लोकलसेवा सुरळीत सुरू होती. सकाळी मेगाब्लॉक सुरू होताच ठाण्यातील फलाट क्रमांक-२ आणि ४ वर गर्दी झाली होती. प्रवाशांना त्रास होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या सोडल्या. यामध्ये ठाणे ते सीएसएमटी अशा २४, तर ठाणे ते डोंबिवली अशा १२ विशेष गाड्या सोडण्यात आल्या. त्याचबरोबर ठाणे- डोंबिवली या नियमित धावणाऱ्या १० गाड्या सुरूच ठेवल्या होत्या. कसारा मार्गावरील या ब्लॉकदरम्यान दोन गाड्या सीएसएमटीवरूनच रद्द करण्यात आल्या होत्या. कल्याणवरून कर्जत लोकल सुरू असल्याने एकही लोकल रद्द केली नसल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
एसटी बसच्या जादा फेºया
एसटी विभागाने नियमित गाड्यांप्रमाणे जादा गाड्यांचे नियोजन ठाणे, कल्याण-डोंबिवली, विठ्ठलवाडी, शहापूर या डेपोंतून केले होते. मेगाब्लॉकदरम्यान एसटीच्या कल्याण-डोंबिवली ५१, तर ठाणे-कल्याण ६१ फेºया झाल्याची माहिती ठाणे एसटी परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली. प्रत्येक डेपोवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी चार विशेष पथके तयार केली होती. लोकांची मागणी झाल्यास आणखी गाड्या सोडण्याची तयारीही ठेवल्याची माहिती एसटीचे वाहतूक अधिकारी आर.एच. बांदल यांनी दिली.

गणपती बाप्पा
मोरयाच्या घोषणा
पत्रीपुलाच्या बाजूच्या पुलावर कल्याणकरांनी पाडकाम पाहण्यासाठी गर्दी केली होती. प्रत्येकजण ही दृश्ये मोबाइल कॅमेºयात टिपत होता. महाकाय क्रेनच्या साहाय्याने गर्डर उचलण्यात आला, तेव्हा नागरिकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

Web Title: Mega Blocks are successful due to forced rest, avoidance of passenger traffic due to extra buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे