सभा तहकुबी, बुलेट प्रस्ताव बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:28 AM2018-02-21T01:28:17+5:302018-02-21T01:28:20+5:30

पोलीस दलाकरिता १५ बुलेट खरेदी करुन देण्याचा प्रस्ताव आणि या प्रस्तावाला विरोध करण्याकरिता दाखल केलेली सभा तहकुबी दोन्ही बारगळल्याचे चित्र मंगळवारी महासभेत पाहायला मिळाले.

The meeting started rebuffing the bullet proposal | सभा तहकुबी, बुलेट प्रस्ताव बारगळला

सभा तहकुबी, बुलेट प्रस्ताव बारगळला

googlenewsNext

ठाणे : पोलीस दलाकरिता १५ बुलेट खरेदी करुन देण्याचा प्रस्ताव आणि या प्रस्तावाला विरोध करण्याकरिता दाखल केलेली सभा तहकुबी दोन्ही बारगळल्याचे चित्र मंगळवारी महासभेत पाहायला मिळाले. सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने हातमिळवणी करुन भाजपाच्या मिलिंद पाटणकर यांना सभा तहकुबी मांडण्यास मिळू नये याकरिता मुंब्रा येथील स्टेडियमचा वाद उकरुन काढला व या गदारोळात विषय पत्रिका पुकारल्याने सभा तहकुबी मांडण्याची संधी त्यांना मिळाली नाही. प्रशासनानेही बुलेट खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह न धरल्याने आता महिनाअखेर होणाºया महासभेत मांडला जाण्याची चिन्हे आहेत.
पोलीस दलाला गस्तीसाठी १५ बुलेट देण्याचा प्रस्ताव महासभेने नामंजूर केला असतांनाही तो तहकुब झाल्याचे भासवून आयुक्त जयस्वाल यांनी तो प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह धरला. मंगळवारच्या महासभेत हा प्रस्ताव आणला तर त्या विरोधात सभा तहकुबी मांडण्याचा इशारा भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी दिला होता.

पाटणकर यांनी दिलेल्या इशाºयामुळे व्यथित झालेल्या जयस्वाल यांना पाठिंबा देण्याकरिता अधिकारी काळ््या फिती लावून सभागृहात हजर झाले होते. मात्र महासभा सुरु होताच त्यांनी त्या काढून ठेवल्या. महासभा सुरू होताच, मुंब्य्राच्या स्टेडिअमच्या मुद्यावरून गदारोळ सुरु झाला. मुंब्य्रातील नगरसेवकांनी भाजपाच्या आमदाराला लक्ष्य केले.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी तब्बल दीड तास या मुद्द्यावरील चर्चा रेटून नेली. याच विषयाच्या अनुषंगाने आयुक्त जयस्वाल यांनी अत्यंत भावनिक भाषण केले. याच वादात महासभेची विषयपत्रिका पुकारली गेल्याने पाटणकर यांना सभा तहकुबी मांडण्याची संधी मिळाली नाही. पोलिसांना बुलेट खरेदी करून देण्याचा प्रस्ताव डिसेंबर महिन्याच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु, पालिकेच्या खर्चातून पोलिसांना बुलेट कशासाठी असा सवाल करीत हा प्रस्ताव सर्वानुमते नामंजूर केला गेला. मंगळवारी झालेल्या या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर प्रशासनानेही बुलेट खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह धरला नाही. त्यामुळे आता महिनाअखेर होणाºया महासभेत पुन्हा हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: The meeting started rebuffing the bullet proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.