खाडीकिनारा विकासाला ‘मेरीटाइम’ची मंजुरी, जलवाहतुकीला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:32 AM2017-11-22T03:32:58+5:302017-11-22T03:33:11+5:30

कल्याण-डोंबिवली शहरांना लागून असलेल्या विस्तीर्ण खाडीकिना-याचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केला जाणार आहे.

'Maritime approval' for development of creek, promote shipping | खाडीकिनारा विकासाला ‘मेरीटाइम’ची मंजुरी, जलवाहतुकीला मिळणार चालना

खाडीकिनारा विकासाला ‘मेरीटाइम’ची मंजुरी, जलवाहतुकीला मिळणार चालना

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना लागून असलेल्या विस्तीर्ण खाडीकिना-याचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी मेरीटाइम बोर्डाने दिली आहे.
बंदरे विकास राज्यमंत्री व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी यासाठी मुंबई मंत्रालयात मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी व महापालिका अधिकारी यांची एक बैठक घेतली. याप्रसंगी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे महापालिकेतील कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा व नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे उपस्थित होते. चव्हाण यांनी मेरीटाइम बोर्डाला कल्याण-डोंबिवली शहराचा खाडीकिनारा विकसित करण्यासाठी ना- हरकत दाखला देण्याचे आदेश दिले आहेत. त्यास मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाºयांनी अनुमती दर्शवली आहे. त्यामुळे खाडीकिनारा विकासासाठी सर्वेक्षणाचे काम तातडीने हाती घ्यावे, असे आदेश चव्हाण यांनी महापालिका अधिकाºयांना दिले आहेत. खाडीकिनारा विकासात डोंबिवली येथील मोठागाव येथे जेटी व संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.
महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पास गती देण्यासाठी राज्य सरकार वेगाने निर्णय घेत आहे. महापालिकेने स्मार्ट सिटीतून २८ प्रकल्पांसाठी दोन हजार ३०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यापैकी एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत स्टेशन परिसर विकास केला जाणार आहे. या प्रकल्पाला सगळ््यात आधी प्राधान्य दिले जाणार आहे.
कल्याण स्टेशन परिसराचा विकास करण्यासाठी ४०० कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मध्य रेल्वेने अनुमती दर्शविली आहे. रेल्वे आणि महापालिका प्रत्येकी ५० टक्के निधी खर्च करणार आहेत. रेल्वे व महापालिकेचा सामंजस्य करार आठ महिन्यांपूर्वी झाला आहे.
स्मार्ट सिटीसाठी महापालिकेने यंदाच्या वर्षात दीडशे कोटींची तरतूद चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात केली आहे. केंद्राकडून ९० कोटी व राज्याकडून ४५ कोटींचा हिस्सा महापालिकेस मिळाला आहे. या निधीतून खाडी किनारा विकसित केला जाणार आहे. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट केली जाणार आहे. खाडीकिनारा विकासासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कल्याणच्या गणेश घाट आणि डोंबिवलीतील खाडीकिनाºयांवरील बेकायदा रेती उपसा करणाºयांवर मोठी कारवाई केली होती.
वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटनंतर कल्याण ते ठाणे हा जलवाहतुकीच्या प्रवासाचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. ठाणे महापालिकेने त्याचा डीपीआर तयार केला आहे. त्यात ठाणे-कल्याण, ठाणे-नवी मुंबई, ठाणे-मुंबई, ठाणे-वसई अशी जलवाहतूक प्रस्तावित आहे. मेरीटाइम बोर्डाच्या ना-हरकतीमुळे जलवाहतुकीसाठी खाडीकिनारा विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याणचे नवीन जंक्शन
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोने जोडले जाणार आहे. या रेल्वेचे दुर्गाडी एक हे स्थानक आहे. कल्याण-भिवंडी खाडीपुलावर नव्याने समांतर सहा पदरी पूल तयार करण्याचे कामही सुरू आहे.
दुर्गाडी ते गंधारे या रिंग रोडच्या पॅचच्या कामाची निविदाही एमएमआरडीएने काढली आहे. वॉटर फ्रंट डेव्हलमेंट या सगळ््यामुळे दुर्गाडी व खाडीकिनारा हे कल्याणचे आणखी एक जंक्शन ठरणार आहे. या शिवाय कल्याण-शीळ मार्गावर कोन ते कल्याण हा एलिव्हेटेड मार्गही प्रस्तावित आहे.

Web Title: 'Maritime approval' for development of creek, promote shipping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.