ठाणे जिल्ह्यातील खासदारांसह ६६ सदस्याना ४९७७५ मतदारांनी नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 07:00 PM2019-05-25T19:00:21+5:302019-05-25T19:04:34+5:30

ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदार संघात ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले आहे. यातील ४९ हजार ७७५ मतदारांनी या तिन्ही खासदाराना आणि ६३ उमेदवारांना नापसंती दर्शवली आहे. यासाठी या मतदारांना नोटा बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावला

 As many as 66 members of Thane district, including 66 MPs, were rejected by 49775 voters | ठाणे जिल्ह्यातील खासदारांसह ६६ सदस्याना ४९७७५ मतदारांनी नाकारले

४९ हजार ७७५ मतदारांनी या तिन्ही खासदाराना आणि ६३ उमेदवारांना नापसंती दर्शवली

googlenewsNext
ठळक मुद्दे३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदानखासदारांसह ६६ सदस्याना ४९७७५ मतदारांनी नाकारले

ठाणे: जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदार संघात ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले आहे. यातील ४९ हजार ७७५ मतदारांनी या तिन्ही खासदाराना आणि ६३ उमेदवारांना नापसंती दर्शवली आहे. यासाठी या मतदारांना नोटा बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
या तिन्ही मतदार संघापैकी ठाणेलोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना ११ लाख ७० हजार ९७० मतदारांनी मतदान केले आहेत. यातील २० हजार ४२५ मतदारांना विद्यमान खासदारांसह २३ उमेदवार नापसंत आहेत. यासाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावता नोटा बटन दाबून या उमेदवारांना नाकारले आहेत. याप्रमाणेच कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान खासदारांसह २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना आठ लाख ९० हजार ६९२ मतदारांनी मतदान केले आहे. पण यातील १३ हजार १२ मतदारांनी विद्यमान विजयी खासदारालाही नाकारत या २८ उमेदवारांपैकी एकाला ही पसंत केले नाही. यामुळे त्यांनी नोटाचा वापर करून या उमेदवाराना नाकारले आहे. तर भिवंडी लोकसभेतील १५ प्रतिस्पर्धी उमेदवारांनाही १६ हजार ३३७ मतदारांना नाकारले आहेत. यासाठी त्यांनी नोटा बटन दाबून नापसंती दर्शवत मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात तसे दहा लाख पाच हजार पेक्षा अधिक मतदान झाले आहे.

Web Title:  As many as 66 members of Thane district, including 66 MPs, were rejected by 49775 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.