आंब्याचे उत्पादन घटतंय : आंबा महोत्सव पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:21 PM2019-04-28T12:21:40+5:302019-04-28T12:23:28+5:30

१ मे ते १० मे या कालावधीत ठाण्यात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात ५० स्टॉल्स असणार आहेत.

Mango production decreases: Organizer information at the Mango Festival press conference | आंब्याचे उत्पादन घटतंय : आंबा महोत्सव पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

आंब्याचे उत्पादन घटतंय : आंबा महोत्सव पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

Next
ठळक मुद्देआंब्याचे उत्पादन घटतंयवातावरणातील बदलामुळे ३५ टक्केच आंबा बाजारात दर सर्वसामान्यांना परवडेल - पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

ठाणे: २०१६ साली एक लाख ८० हजार हेक्टरमध्ये ३ लाख २० हजार मेट्रीक टन उत्पादन येत होते. हे उत्पादन खाली येत २०१७ साली २ लाख ५६ हजार मेट्रीक टन आणि २०१८ साली १ लाख २८ हजार मेट्रीक टन आले. यंदा वातावरणातील बदलामुळे ३५ टक्केच आंबा बाजारात येईल अशी माहिती आंबा महोत्सवात देण्यात आली.
              या महोत्सवाची माहिती देण्यासाठी रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आंबा कमी प्रमाणात आला तरी त्याचे दर सर्वसामान्यांना परवडेल असेच आहे अशी माहिती संस्कारचे पदाधिकारी विष्णू रानडे यांनी दिली. तसेच, बाहेरचे विक्रेते कर्नाटकचा आंबा आणि कोकणातील आंबा मिक्स करुन विकत असल्याचा आरोप कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केला. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव १ मे ते १० मे या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत न्यू इंग्लिश स्कूलचे पटांगण ेयेथे आयोजित केला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायं. ५ वा. उद्घाटन होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. १५ वर्षांपुर्वी आंबा विक्री ही दलालांच्या हाती होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळत नव्हता. शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळ घालून कोकणातील शेतकऱ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले. या महोत्सवातून गवतात पिकलेला आंबा ग्राहकांना मिळणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. महोत्सवात यंदा ५० स्टॉल्स असून त्यातील ४० स्टॉल्स हे आंब्याचे आणि उवर्रित १० स्टॉल्स हे महिला बचत गटांसाठी देण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर आंबापोळी ते पन्हे असे विविध प्रकारांची कोकणातील उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. मुंबईत ३६० कोटी आंब्याची विक्री होते. त्यातील १०० कोटी रुपयांच्या आंब्याची निर्यात होते अशी माहिती रानडे यांनी दिली. गेल्यावर्षी या महोत्सवात जवळपास सव्वा दोन कोटींची खरेदी-विक्री झाली. यंदाच्या महोत्सवात ३ कोटीपर्यंत आंब्याची उलाढाल जाऊ शकते अशी आशा पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी संस्कारचे संतोष साळुंखे देखील उपस्थित होते.

Web Title: Mango production decreases: Organizer information at the Mango Festival press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.