Makar Sankranti 2018 : ड्रायफ्रुट्स, टुटीफ्रुटी, सुक्या खोब-याचा लाडवांत वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:01 AM2018-01-14T04:01:59+5:302018-01-14T04:02:05+5:30

मावा तीळ बोरिंडा, हनी तीळ बोरिंडा, तीळ मावा कतली, तीळ मावा बर्फी यासारख्या तिळगुळातील अनोख्या व्हरायटीजने खवय्यांचे लक्ष वेधले आहे. बाजारात पारंपरिक तीळगूळ आले असले तरी मिठाईच्या दुकानांत तिळगुळात आलेल्या व्हरायटीने खवय्यांना आकर्षित केले आहे. या व्हरायटीजमध्ये यंदा ‘तीळ मावा कतली’ नव्याने बनवण्यात आली आहे.

Makar Sankranti 2018: Dry Frutts, Troubleshooting, Dry Khobo Spray Use | Makar Sankranti 2018 : ड्रायफ्रुट्स, टुटीफ्रुटी, सुक्या खोब-याचा लाडवांत वापर

Makar Sankranti 2018 : ड्रायफ्रुट्स, टुटीफ्रुटी, सुक्या खोब-याचा लाडवांत वापर

Next

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : मावा तीळ बोरिंडा, हनी तीळ बोरिंडा, तीळ मावा कतली, तीळ मावा बर्फी यासारख्या तिळगुळातील अनोख्या व्हरायटीजने खवय्यांचे लक्ष वेधले आहे. बाजारात पारंपरिक तीळगूळ आले असले तरी मिठाईच्या दुकानांत तिळगुळात आलेल्या व्हरायटीने खवय्यांना आकर्षित केले आहे. या व्हरायटीजमध्ये यंदा ‘तीळ मावा कतली’ नव्याने बनवण्यात आली आहे. महाराष्ट्रीय खवय्ये तीळगूळ बोरिंडाला, तर सिंधी समाजातील खवय्ये मावा तीळ बोरिंडा आणि हनी तीळ बोरिंडाला पसंती देत असल्याचे दुकानमालकांनी सांगितले.
रविवारी मकरसंक्रांत असल्याने शनिवारीच तिळगुळाच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी उसळली होती. ही गर्दी रविवार सकाळपर्यंत असेल, असे मिठाईच्या दुकानाचे मालक मनीष चांदवानी यांनी सांगितले. तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू, काटेरी हलवा हे दरवर्षी बाजारात उपलब्ध असतात. परंतु, संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळावर वेगवेगळे प्रयोग करून अनोख्या व्हरायटीज तयार केल्या जातात. तीळ मावा रोल, तीळगूळ बोरिंडा, कडक तीळ बोरिंडा, तीळ बोरिंडा लाई, तीळ बोरिंडा चिक्की या व्हरायटीजचा त्यामध्ये समावेश होता. वेगवेगळ्या मिठाईसारखेच आकार या तिळगुळाच्या व्हरायटीजना दिले असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. गेल्या वर्षी आम्ही तीळ मावा रोल बनवला होता. यंदा तीळ मावा कतली बनवली असल्याचे मनीष यांनी सांगितले. हे सर्व पदार्थ ड्रायफ्रुट्सयुक्त आहेत. तिळगुळाच्या लाडवांमध्ये टुटीफ्रुटी आणि सुके खोबरेदेखील वापरण्यात आले आहे. हे सर्व पदार्थ गुळाबरोबर साखरेतही बनवले आहेत. परंतु, गुळाच्या पदार्थांनाच अधिक मागणी असल्याचे मनीष म्हणाले.

Web Title: Makar Sankranti 2018: Dry Frutts, Troubleshooting, Dry Khobo Spray Use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.