मुंब्रा येथून एका संशयित अतिरेक्याला अटक, एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 03:13 PM2019-01-27T15:13:00+5:302019-01-27T15:26:57+5:30

महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्रा येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. शनिवारी (26 जानेवारी) एटीएसने  केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, टॅबलेट, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, राउटर आणि काही मोबाइल जप्त केले आहेत.

Maharashtra ATS One more person arrested yesterday from Mumbra | मुंब्रा येथून एका संशयित अतिरेक्याला अटक, एटीएसची कारवाई

मुंब्रा येथून एका संशयित अतिरेक्याला अटक, एटीएसची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्रा येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. शनिवारी (26 जानेवारी) एटीएसने  केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, टॅबलेट, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, राउटर आणि काही मोबाइल जप्त केले आहेत. एटीएसने आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयावरून याआधी मुंब्रा आणि औरंगाबादमधून एकूण 9 जणांना अटक केली होती. 

ठाणे - महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्रा येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. शनिवारी (26 जानेवारी) एटीएसने  केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, टॅबलेट, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, राउटर आणि काही मोबाइल जप्त केले आहेत. यासोबतच एटीएसला संशयिताकडे एक डायरीही सापडली आहे. 

एटीएसने आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयावरून याआधी मुंब्रा आणि औरंगाबादमधून एकूण 9 जणांना अटक केली होती. एटीएसने सलमान खान, फहाद शाह, झमेन  कुटेपडी, मोहसीन खान, मोहम्मद मझर शेख, ताकी खान, सरफराज अहमद, झाहीद शेख आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा या संशयित आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून काही रसायने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, धारदार चाकू, मोबाईल्स आणि सिम कार्ड्स पोलिसांनी हस्तगत केली होती.



आयसिस या आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीने प्रेरित होऊन दहशतवादी टोळी बनविण्याचे व दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे कट रचून त्या दृष्टीने साहित्याची जमवाजमव केल्याचे निष्पन्न होत असल्याने ताब्यात घेतलेल्या संशयितांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा १९६७ कलम १८, २०, ३८, ३९,भा . दं. वि. कलम १२० (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Web Title: Maharashtra ATS One more person arrested yesterday from Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.