प्रियकराचा विवाहितेवर घरात घुसून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:33 AM2019-01-24T01:33:00+5:302019-01-24T01:33:06+5:30

लग्नाच्या आधी घेतलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहितेवर तिच्या राहत्या घरात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत सोमवार, २१ जानेवारी रोजी उघडकीस आली.

lover married women to rape in house | प्रियकराचा विवाहितेवर घरात घुसून बलात्कार

प्रियकराचा विवाहितेवर घरात घुसून बलात्कार

Next

भिवंडी- लग्नाच्या आधी घेतलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहितेवर तिच्या राहत्या घरात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत सोमवार, २१ जानेवारी रोजी उघडकीस आली. पीडित विवाहितेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्र ारीची दखल घेत पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. परवेज हे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो फरार झाला. लग्नाच्या आधी पीडित विवाहितेशी परवेजचे प्रेमसंबंध होते. प्रेमाच्या आणाभाका देत त्याने मार्च २०१८ मध्ये ती राहत असलेल्या घरातच तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी त्याने त्याच्या मोबाइलमध्ये पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढले होते. काही वर्षांनी तिचा विवाह दुसऱ्या मुलाशी झाला. त्यानंतरही परवेज तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करू लागला; मात्र तिने नकार देताच लग्नाच्या आधीचे फोटो व्हायरल करण्याची आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन त्याने बलात्कार केला.
विवाहितेच्या तक्र ारीनंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात परवेजविरोधात बलात्काराचा आणि तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश दाभाडे करत आहेत.

Web Title: lover married women to rape in house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.