ठाणे जिल्ह्यातील गरीब - कष्टकऱ्यांसाठी आता आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 05:42 PM2018-09-24T17:42:36+5:302018-09-24T17:47:58+5:30

Life-long life for the poor and the poor in Thane district - Prime Minister Jan Arogya Yojana | ठाणे जिल्ह्यातील गरीब - कष्टकऱ्यांसाठी आता आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागदपत्र वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजी विक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील तीन लाख ५० हजार कुटुंबियांना या आरोग्य योजनेचा लाभप्रातिनिधिक स्वरूपात दहा कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटपहीजिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ८३ हजार ८९३ तर शहरी भागात दोन लाख ६५ हजार कुटुंबांना या आरोग्य योजनेचा लाभ


ठाणे : जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागदपत्र वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजी विक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवारी झाला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दहा कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटपही यावेळी केले. जिल्ह्यातील तीन लाख ५० हजार कुटुंबियांना या आरोग्य योजनेचा लाभ होईल.
पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार किसन कथोरे, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमात अलका धोंगडे, शंकर घोडे, जयेश गोडे, सुमन इतरकर, रु पाली धोंगडे, मानसी भगत, चंद्रकांत साबळे, लक्ष्मी घोडे, सखुबाई आदी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्थ कार्ड देण्यात आले.
सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधांसाठी संरक्षण असते, आरोग्य विमा प्रीमियम हप्ते भरणाऱ्यां  लोकांनाही ते मिळते पण गरीब आणि दुर्बल घटकाला वैद्यकीय मदतीची गरज भासली तर पैशाअभावी त्यांना उपचार मिळू शकत नाहीत. पण आयुष्यमान भारत योजनेमुळे संपूर्ण देश निरोगी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. देशभरातील सरकारी रु ग्णालये या योजनेत सहभागी आहेत. तशीच लवकरच बहुसंख्य खासगी रु ग्णालये देखील यात समाविष्ट करण्यात येतील, असे जावडेकर यांनी याप्रसंगी बोलतांना स्पष्ट केले. कथोरे व कपिल पाटील यांनी देखील या योजनेमुळे वैद्यकीय लाभ मोठ्या प्रमाणावर गरिबांना मिळून या क्षेत्रात क्र ांती येईल असे सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाले की कोणत्याही शहराचा हैपी इंडेक्स हा केवळ शहरातील इमारती, सुविधा यावर मोजता येत नाही तर तेथील नागरिकांचे आरोग्य कसे आहे यावरही अवलंबून आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ८३ हजार ८९३ तर शहरी भागात दोन लाख ६५ हजार कुटुंबांना या आरोग्य योजनेचा लाभ होईल. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रु ग्णालय व भिवंडी येथील इंदिरा गांधी, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच उल्हासनगर येथील रु ग्णालये या योजनेसाठी संलिग्नत करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत एक हजार १२२ आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, वरळी येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे.
............
 

Web Title: Life-long life for the poor and the poor in Thane district - Prime Minister Jan Arogya Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.