कल्याणहून सुटणाऱ्या 'लेडीज स्पेशल'मध्ये मोटरमन, गार्डसह टीसी, आरपीएफ महिलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:53 PM2018-03-08T12:53:15+5:302018-03-08T14:12:01+5:30

जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याणहून सुटणा-या लेडीज स्पेशल लोकलची धुरा गुरुवारी महिला मोटरमन मुमताज काझी आणि महिला गार्ड मयुरी कांबळे यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ही लोकल वेळापत्रकानूसार सीएसएमटीपर्यंत नेली.

Lademen, guarded guard, TC, RPF woman in Ladies Special local leaving Kalyan | कल्याणहून सुटणाऱ्या 'लेडीज स्पेशल'मध्ये मोटरमन, गार्डसह टीसी, आरपीएफ महिलाच!

कल्याण स्थानकातून सीएसएमटीपर्यंत धावली लोकल

googlenewsNext
ठळक मुद्देनिमित्त महिला दिनाचेकल्याण स्थानकातून सीएसएमटीपर्यंत धावली लोकल

डोंबिवली: जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याणहून सुटणा-या लेडीज स्पेशल लोकलची धुरा गुरुवारी महिला मोटरमन मुमताज काझी आणि महिला गार्ड मयुरी कांबळे यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ही लोकल वेळापत्रकानूसार सीएसएमटीपर्यंत नेली.

कल्याण स्थानकातून दररोज सकाळी ८ वाजून १ मिनिटांनी सीएसएमटीसाठी लेडीज स्पेशल लोकल सुटते त्याच वेळेत ती नेहमीप्रमाणे सुटली. त्याआधी महिला कर्मचा-यांचा प्रवाशांनी यथोचित सन्मान केला. याशिवाय याच लोकलमध्ये टीसी, आरपीएफ यादेखील महिलाच तैनात करण्यात आल्या होत्या. त्यांचाही प्रवासी संघटनांच्या वतीने या सगळयांचा सत्कार करण्यात आला. कुटुंबीय आणि रेल्वेचे अधिकारी, सहकारी यांच्या पाठींब्यामुळेच आजवर काम करू शकल्याचं या या सगळयांनी यावेळी सांगितले. महिला प्रवाशांनीही उत्स्फूर्तपणे विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. एरव्ही जागेसाठी एकमेकींमध्ये भांडाभांडी करणा-या महिला प्रवासी महिला दिनानिमित्ताने मात्र एकमेकींशी सहकार्याची भावना ठेवून प्रवास करतांना आढळल्या.

 

Web Title: Lademen, guarded guard, TC, RPF woman in Ladies Special local leaving Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.