विद्यार्थी संख्येअभावी २८ प्राथमिक शाळांना कायमचे कुलूप; शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 12:15 AM2018-12-09T00:15:42+5:302018-12-09T00:16:13+5:30

जि.प.ची कार्यवाही, इमारतींच्या देखभालीवर सोसावा लागतो आर्थिक भुर्दंड

Lack of 28 primary schools forever due to lack of numbers; Government decision | विद्यार्थी संख्येअभावी २८ प्राथमिक शाळांना कायमचे कुलूप; शासनाचा निर्णय

विद्यार्थी संख्येअभावी २८ प्राथमिक शाळांना कायमचे कुलूप; शासनाचा निर्णय

Next

- सुरेश लोखंडे

ठाणे : पुरेशा प्रमाणात विद्यार्थी संख्या नसतानाही ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बिनधास्त सुरू आहेत. त्यावरील शिक्षकांचे वेतनासह शाळा इमारतींच्या देखभाल दुरुस्तीवर शासनाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यास आळा घालण्यासाठी कोणत्याही निकषांमध्ये बसत नसलेल्या त्यातील २८ प्राथमिक शाळांना आता कायमचे कुलूप लागणार आहे. तर उर्वरित १६ शाळांसाठी विविध स्वरूपाचे निकष लावून त्यांचा बचाव केला आहे.

हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यात कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आगामी दोन महिन्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी शिक्षण विभागांव्दारे सुरू झाली. त्यानुसार सर्वप्रथम अशा शाळांची यादी जिल्हा परिषदेव्दारे तयार करण्यात आली. त्यामध्ये २० पेक्षा कमी म्हणजे १९ किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा प्राधान्याने बंद करण्यात येत आहेत. या शैक्षणिक एकही शाळा कमी विद्यार्थी संख्येची नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे मागील वर्षी विद्यार्थी संख्या नोंदवलेल्या आणि या वर्षीदेखील त्यांना पटसंख्या वाढवता आली नाही, अशा २८ शाळांची यादी तयार झाली असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले.

कायमच्या बंद करण्यात येत असलेल्या शाळांमध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावपाड्यातील १५ प्राथमिक शाळांचा समावेश आहे. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील चार, कल्याणमधील चार, अंबरनाथ तालुक्यातील दोन, शहापूरमधील दोन आणि उल्हासनगर येथील एका शाळेचा समावेश आहे. कमी पटसंख्येच्या ४४ पैकी २८ शाळांना आता लवकाच कायमचे कुलूप लागणार आहे. त्यातील विद्यार्थी जवळच्या शाळेत दाखल करून शिक्षकांचेदेखील अन्य शाळांमध्ये आता समायोजन होणार आहे.

विविध प्रकारच्या निकषांमुळे दहा शाळांवरील गंडांतर टळले
कमी विद्यार्थी संख्या असूनही बचावलेल्या या शाळांमध्ये भिवंडी तालुक्यातील तीन शाळांचा समावेश आहे. या शाळांच्या सुमारे तीन किमी. अंतरावर शाळा नाही. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय आळण्यासाठी या शाळांवरील गंडांतर टळले. याप्र्रमाणेच मुरबाड तालुक्यातीलदेखील दोन शाळांचा बचाव झाला आहे.
तर अंबरनाथमधील एक उर्दू शाळा या कारवाईतून बचावली आहे. या शाळेच्या जवळपास एकही उर्दू शाळा अस्तित्त्वात नाही. या शाळेतील उर्दूभाषिक विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ही शाळा सुरू ठेवणे भाग पडले आहे. याप्रमाणेच शहापूरमधीलदेखील काही शाळांचा बचाव झालेला आहे.
सुमारे दहा शाळांचे गंडांतर या विविध निकषांमुळे टळले आहे. याप्रमाणेच उर्वरित सहा शाळांमधील पटसंख्या वाढवता आल्यामुळे त्यांच्यावरील बंद होण्याचे संकट टळल्याचे प्राप्त अहवालावरून दिसून
येत आहे.

Web Title: Lack of 28 primary schools forever due to lack of numbers; Government decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.