खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची हत्या, भार्इंदरमधील घटना : पवई पोलिसांकडून दोघांना अटक, सीसीटीव्ही फूटेजमुळे उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:33 AM2017-11-15T03:33:03+5:302017-11-15T03:33:26+5:30

मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाची भार्इंदरच्या आझाद नगरमधील महापालिका मैदानात गळा आवळून हत्या करण्यात आली.

 Killing of kidnapping boy for ransom, Bharinder incident: Police arrested two policemen, CCTV footage unraveled | खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची हत्या, भार्इंदरमधील घटना : पवई पोलिसांकडून दोघांना अटक, सीसीटीव्ही फूटेजमुळे उलगडा

खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची हत्या, भार्इंदरमधील घटना : पवई पोलिसांकडून दोघांना अटक, सीसीटीव्ही फूटेजमुळे उलगडा

Next

मीरा रोड : मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाची भार्इंदरच्या आझाद नगरमधील महापालिका मैदानात गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोघांना मंगळवारी अटक केली आहे.
पवईतील बबलू सिंग यांचा १० वर्षांचा मुलगा रितेश रविवारी दुपारपासून बेपत्ता होता. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. बबलू यांचा चुलत भाऊ संतोष सिंगसोबत काम करणारा अमर सिंग (२०) याने त्याला खेळण्यासाठी म्हणून नेले. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. अमरने मात्र मुलाला घराजवळच सोडले, असा कांगावा केला होता.
दरम्यान, पोलिसांना अंधेरी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये रितेशला घेऊन जाताना अमर व त्याचा साथीदार लालू ननकू सिंग (२१) दिसले. त्यानंतर अमरला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लालूला सामील होऊन रितेशची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर या दोघांना अटक करीत मंंगळवारी पहाटे पवई पोलिसांच्या पथकाने मैदानात टाकलेला रितेशचा मृतदेह ताब्यात घेतला.
फोनमुळे घाबरल्याने रितेशला संपवले-
बबलू सिंग यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे, मात्र त्यांच्या घरी रोज जाणे-येणे असलेल्या अमर सिंग याने बबलू यांना एकदा पैसे मोजताना पाहिले होते. त्यामुळे बबलू यांच्याकडे भरपूर पैसे आहेत या समजातून त्यांच्या मुलाचे अपहरण त्याने केले. मात्र मुलगा हरवल्यानंतर माझा मुलगा कुठे आहे, हे विचारण्यासाठी बबलू यांनी अमर याला फोन केल्याने घाबरलेल्या अमरने रितेश याची हत्या केली.
ज्या मैदानात हत्या केली ते पालिकेच्या मालकीचे असून येथे भंगाराची गोदामे, झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे मद्यपी, गर्दुल्ल्यांचा राबता असतो. एक वर्षापूर्वी ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून येथे तिची हत्या केली होती.

Web Title:  Killing of kidnapping boy for ransom, Bharinder incident: Police arrested two policemen, CCTV footage unraveled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.