मुरबाड : वासिंद तालुक्यात ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनेक रस्त्यांचे डांबरीकरण, नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, हे शासकीय प्रोटोकॉलनुसार न करता पालकमंत्र्यांसोबतच प्रशासकीय यंत्रणेला डावलून ठेकेदारासोबत आमदार, खासदारांनी भूमिपूजनाचा कार्यक्र म घाईघाईत उरकण्याचा सपाटा लावला आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही लगीनघाई सुरू असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत मुरबाड तालुक्यात पाच कोटींचा निधी रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, नूतनीकरणासाठी उपलब्ध झाला आहे. सरळगाव काँक्रि टीकरण, सायले, शीळघर, किसळ, झाडघर, कांदळी, पºहे, बंगालपाडा, धसई याअंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन रविवार, २९ आॅक्टोबर रोजी खा. कपिल पाटील व आ. किसन कथोरे यांनी सरकारी ऐवजी भाजपाचा कार्यक्र म या नावाखाली उरकले. केवळ होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर डोळा ठेवून भूमिपूजन आणि सोबत कार्यकर्ता मेळावा आयोजित करून दिखाव्याचा बडेजाव केला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.