अग्निशमन नोटिशींना केराची टोपली, हॉटेल व्यावसायिकांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 06:28 AM2018-01-03T06:28:14+5:302018-01-03T06:28:27+5:30

मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४०० हॉटेल, पब ना सहा महिन्यांत पुन्हा दुस-यांदा नोटिसा बजावल्या आहेत.

 Kearney basket, firefighting noticeers, ignore hoteliers | अग्निशमन नोटिशींना केराची टोपली, हॉटेल व्यावसायिकांचे दुर्लक्ष

अग्निशमन नोटिशींना केराची टोपली, हॉटेल व्यावसायिकांचे दुर्लक्ष

Next

ठाणे : मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४०० हॉटेल, पब ना सहा महिन्यांत पुन्हा दुसºयांदा नोटिसा बजावल्या आहेत. यापूर्वीही एकाही हॉटेल अथवा पबचालकांनी कागदपत्रांची पूर्तता केली नव्हती. आतादेखील तिच परिस्थिती असून एकाही हॉटेलचालकाने ती केली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता तरी पालिका त्यांच्या विरोधात कारवाईचे हत्यार उगारणार की आपली तलवार म्यान करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहरातील ज्या हॉटेल व्यावसायिंकाकडे फायरची एनओसी नसेल त्या सर्वांना महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक कायदा, २००६ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३ मधील तरतूदीनुसार ७१ तासांच्या अवधीची नोटिस बजावली आहे. परंतु, ७२ तास उलटून गेल्यानंतरही अग्निशमन दलामार्फत नोटिसा बजावण्याचे काम सुरूच आहे. बुधवार पर्यंत त्या बजावल्या जाणार असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाईल, असे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.
मुबंईत कमला मिल येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने अग्नी सुरक्षा यंत्रणांची पूर्तता न करणाºया हॉटेल व्यावसायिकांच्या बाबतीत कडक भूमिका अवलंबली आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत एनओसी नसलेल्या हॉटेल, पब आणि तळघरातील हॉटेलचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर अग्निशमन विभागाने अशा हॉटेलना नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, तेव्हा या सर्वांकडून शून्य प्रतिसाद मिळाला होता. आता मुंबईत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागामार्फत पुन्हा नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबईत घडलेल्या घटनेनंतर आता ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत हॉटेलांना कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटिस बजावली असून आजही ती कारवाई सुरूच आहे.
मात्र,महापालिकेच्या या आदेशाला हॉटेल मालकांनी गांभीर्याने घेतले नसून दोन दिवस उलटूनही एकाही हॉटेलचालकाने कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.

 
 

Web Title:  Kearney basket, firefighting noticeers, ignore hoteliers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.