केडीएमसीचा आपत्कालीन कक्षच 'आपत्तीत' - राजेश मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 06:20 PM2018-06-09T18:20:07+5:302018-06-09T18:20:07+5:30

पावसाळ्या पूर्वी महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालय मध्ये आपत्कालीन कक्ष तयार केला जातो. तसा यंदाही कल्याण डोंबिवली महापालिकेने तयार केला आहे, मात्र तेथिल सुविधांचा अभाव पाहता आपत्कालीन कक्षच आपत्तीत आल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया महापालिका सभागृह नेते राजेश मोरे यांनी दिली.

KDMC's Emergency Cell 'Apastache' - Rajesh More | केडीएमसीचा आपत्कालीन कक्षच 'आपत्तीत' - राजेश मोरे

कोयत्याला धार नाही, वॉकीटॉकी बंद

googlenewsNext
ठळक मुद्दे कोयत्याला धार नाही, वॉकीटॉकी बंद आयुक्तांशी करणार पत्रव्यवहार

डोंबिवली - पावसाळ्या पूर्वी महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालय मध्ये आपत्कालीन कक्ष तयार केला जातो. तसा यंदाही कल्याण डोंबिवली महापालिकेने तयार केला आहे, मात्र तेथिल सुविधांचा अभाव पाहता आपत्कालीन कक्षच आपत्तीत आल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया महापालिका सभागृह नेते राजेश मोरे यांनी दिली.
यासंदर्भात ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमध्ये शनिवारी ‘सतर्क रहायचे पण कसे’ या मथळयाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्याची दखल घेत मोरे यांनी डोंबिवलीतील ठिकठिकाणच्या आपात्कालीन कक्षांमध्ये जाऊन पाहणी केली. महापालिकेच्या उपइमारतीमधील ग आणि फ, ह प्रभागातील आपत्कालीन कक्षाची दुरावस्था झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेथिल कोयता त्यांनी हातात घेतला, एका तोडलेल्या फांदीवर मारला असता त्याला धार नाही, कोयत्याचे लोखंड जीर्ण झाले होते. औषध व्यवस्थेत तुटवडा, औषधांचा बॉक्स रिकामा धुळखात पडला होता. महापालिकेने दिलेली साधनसामुग्री अपुरी असून त्याची सुद्धा दुरावस्था झालेली आहे. कक्षातील वॉकिटॉकी खराब झाला असून प्रथोमचार पेटीत ओषधे नाहीत. कामगारांना दिलेले कोयता तुटलेला असून इतर साहित्य पण काही कामाचे नसल्याचे कामगाराचं सांगतात. तर साहित्य कमी असल्याचे उघड झाले आहे. कक्षाची दुरवस्था असल्याने कर्मचा-यांनी काम तरी कसे करायचे असा सवाल त्यांनी अधिका-यांना केला. कर्मचारी अपुरा, साधनसामुग्री अपुरी मग आपात्कालीन स्थितीत नेमके आहे तरी कोण? असेही मोरे म्हणाले. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब असून त्याबाबत आयुक्तांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच या अवस्थेसंदर्भात जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. महापालिकेच्या सर्वच प्रभागांमधील आपत्कालीन कक्षाला योग्य ती साधनसामुग्री देण्यासाठी हालचाल करणार असल्याचे म्हंटले.
  लोकमतच्या वृत्तानंतर जाग आली का? अशी चर्चा महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या कर्मचा-यांसह नागरिकांमध्ये सुरु होती. या वृत्तामुळे अपेक्षित सुधारणा होतील का? की पुन्हा स्थिती ये रे माझ्या मागल्यासारखी असेल अशीही मत व्यक्त झाली.

Web Title: KDMC's Emergency Cell 'Apastache' - Rajesh More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.