केडीएमसीचे फेरीवाला धोरणच चुकीचे, आयुक्त मंत्रालयात गेल्याने बैठक झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 03:23 AM2018-03-16T03:23:53+5:302018-03-16T03:23:53+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे.

The KDMC hawkers policy was wrong, the commissioner went to the ministry, canceled the meeting | केडीएमसीचे फेरीवाला धोरणच चुकीचे, आयुक्त मंत्रालयात गेल्याने बैठक झाली रद्द

केडीएमसीचे फेरीवाला धोरणच चुकीचे, आयुक्त मंत्रालयात गेल्याने बैठक झाली रद्द

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे. त्यानुसार, अडीचशे फेरीवाले प्रत्येक प्रभागात बसवले जाणार आहेत. परंतु, जेथे व्यवसाय होऊ शकत नाही, अशा ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हिताचे ठरणार नाही. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांच्या जागी जर फेरीवाले बसवले, तर मोठा गोंधळ उडेल. त्यामुळे कुठलाही अभ्यास न करता हे धोरण ठरवल्याचे फेरीवाला संघटनेचे नेते अरविंद मोरे यांचे म्हणणे आहे.
केडीएमसी हद्दीत दोनतीन वर्षांत मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढले आहेत. या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण महापालिके कडून केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी भरून घेण्यात येत असलेल्या अर्जासाठी अधिकारी बक्कळ पैसे उकळत आहेत. त्यामुळे त्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही मोरे यांनी केला आहे.
फेरीवाला धोरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता बैठक बोलावली होती. मात्र, वेलरासू यांना तातडीच्या कामासाठी मंत्रालयात जावे लागल्याने बैठक रद्द करावी लागल्याचे कारण दिले असले, तरी त्यांना फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, अशा शब्दांत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यामुळे एकंदरीतच प्रशासनाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा कायम असताना त्यांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने आजवर कोणतीही ठोस कृती केडीएमसीने केलेली नाही. केडीएमसीने स्थापन केलेली शहर फेरीवाला समिती ही नगरपथविके्रता समिती म्हणून पुनर्जीवित केली आहे. या समितीचे अध्यक्ष आयुक्त हे स्वत: असून यात प्रमुख अधिकारी आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. परंतु, वेलरासू यांनी स्वत: बोलावलेली बैठक त्यांनीच रद्द केल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. काही जणांना दूरध्वनीवर बैठक रद्द झाल्याची माहिती देण्यात आली, तर काहींना केडीएमसीच्या मुख्यालयात आल्यावरच बैठक रद्द झाल्याचे कळले. त्यामुळे फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली.
>पुढील बैठकीची तारीखही नाही
आयुक्त पी. वेलरासू यांना मंत्रालयात कामासाठी जावे लागल्याने गुरुवारी बैठक रद्द झाल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, असे असलेतरी पुढील बैठकीची तारीख मात्र सांगितलेली नाही. प्रशासनाला फेरीवालाप्रश्नी कोणतेही गांभीर्य नाही. आयुक्तांना फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, अशी टीका फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.
>काटेमानिवलीत फेरीवाल्यांवर कारवाई
कोळसेवाडी : कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्राचे अधिकारी भागाजी भांगरे यांच्या पथकाने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात काटेमानिवली येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. त्यात महापालिकेच्या शाळेसमोरील १२ पक्क्या शेड आणि चार पक्क्या टपºया जमीनदोस्त केल्या. दरम्यान, प्रल्हाद शिंदे उड्डाणपूल ते कोळसेवाडी गणपती मंदिरापर्यंतच्या दोन्ही बाजूंकडील फेरीवाले व वाहनांचे पार्किंग यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. महापालिकेने येथील फेरीवल्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: The KDMC hawkers policy was wrong, the commissioner went to the ministry, canceled the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.