खाडीकिनाऱ्यांवरील १६०० हेक्टरवरील कांदळवन आता पुन्हा बहरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:16 AM2018-09-19T04:16:08+5:302018-09-19T04:16:32+5:30

न्यायालयाच्या निर्णयामुळे मिळणार दिलासा; रेतीमाफियांना चाप बसण्याची शक्यता

Kandalvan on 1600 hectares of creeks will grow again | खाडीकिनाऱ्यांवरील १६०० हेक्टरवरील कांदळवन आता पुन्हा बहरणार

खाडीकिनाऱ्यांवरील १६०० हेक्टरवरील कांदळवन आता पुन्हा बहरणार

googlenewsNext

- सुरेश लोखंडे

ठाणे : नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर, नागलाबंदर, मीरा-भार्इंदर, भिवंडी, दिवा, कळवा, मुंब्रा आदी ठिकाणच्या खाडीकिनारी सुमारे एक हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर कांदळवन, खारफुटी आणि तिवरांचे जंगल आहे. सततच्या कत्तलीनंतरही काही कांदळवने तग धरून आहेत. काही ठिकाणी जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित करून सुमारे ७२ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. आता मुंबई उच्च न्यायालयाने सक्त ताकीद दिल्यामुळे कांदळवनाची वाढ होऊन ते बहरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
समुद्र, खाडीकिनारी उद्भवणाºया त्सुनामीच्या संकटापासून कांदळवन व तिवरांच्या जंगलामुळे बचाव होतो. यामुळे त्यांचा ºहास होऊ न देता त्यांचे संरक्षण करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. सोमवारी पुन्हा त्यावर शिक्कामोर्तब होऊन कांदळवन, तिवरांच्या झाडांना सक्तीने वाढवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले. रेतीच्या हव्यासापोटी रेतीमाफियांनी ठिकठिकाणचे कांदळवन नष्ट करून मनसोक्त रेती उत्खनन केली. यामुळे दिवाखाडीसह, मुंब्रा, कोपर, कळवा आदी खाडीकिनारे ओस पडले आहेत. कांदळवन नष्ट झाल्यामुळे या खाडीचे पाणी रेल्वे रुळांपर्यंत पोहोचल्याचे वास्तव आहे.
ठिकठिकाणच्या खाडीकिनारी दोन हजार हेक्टरपेक्षा क्षेत्रावर कांदळवन-तिवरांची झाडे आहेत. पण रेती काढण्यासाठी अडथळा ठरणाºया या तिवराच्या झाडांसह कांदळवनाच्या बुंध्याशी केमिकल्स टाकून रेतीमाफियांनी ते नष्ट केले. यामुळे काही ठिकाणचे खाडीकिनारे पूर्णपणे ओसाड झाले. त्यावर भरतीचे पाणी शिरून या मोकळ्या ठिकाणी गाळ साचला. मात्र या गाळातूनही नष्ट केलेले तिवरांच्या झाडांचा बुंधा, लाकूडतोड करून अस्तित्वाची जाणीव करून देताना दिसून येत आहे. प्रशासनाकडे सुमारे एक हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनाची नोंद आढळते. पण सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त कांदळवन, तिवरांचे क्षेत्र जिल्ह्यात असल्याचे जाणकारांकडून कळते. या वनाच्या संवर्धनासाठी न्यायालयीन आदेशानंतर राजपत्रातदेखील वनसंवर्धन घोषित करण्यात आले होते. सोमवारी याचिकेवर न्यायालयात सुनावणी होऊन प्रशासनावर न्यायालयाने जोरदार ताशेरे आढले. कांदळवनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या आधीच कांदळवन किंवा पाणथळ जागेचा नाश करणाºया सुमारे ६० जणांवर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गुन्हे दाखल केले होते. यात नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा-भार्इंदर या भागातील कांदळवन व जागा नाश करणाºयांचा समावेश आहे.

भिवंडी तालुक्यात शासकीय जमिनीवरील कांदळवन व्याप्ती सुमारे १३७ हेक्टरची आहे. ती वन संरक्षित करण्यासाठी प्रस्तावित आहे. ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवर सुमारे १,४७१ हेक्टर क्षेत्रावर कांदळवन आहे. त्याची अधिसूचना वर्षापूवीच काढण्यात आली होती.
याशिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन संरक्षण समिती स्थापन झालेली आहे. सतत होणारा ºहास थांबविण्यासाठी या कांदळवनाच्या क्षेत्रास राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याची प्रारूप अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्धही झाली आहे.
या अधिसूचनेमध्ये वाशी, तळवली, सारसोळे, नेरूळ, घणसोली, जुहू, तुर्भे, कोपरखैरणे, गोठवली, सोनखार, शहाबाज, दिवे, करावे आणि ऐरोली या गावांमधील कांदळवन जमिनीचा समावेश झाला आहे. वनसंवर्धनासाठीच्या याचिकेमध्ये न्यायालयाने जोरदार ताशेरेही ओढले होते.

Web Title: Kandalvan on 1600 hectares of creeks will grow again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे