Kalyan's Patri Pool : कल्याणजवळील पत्रीपुलाचे पाडकाम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 12:04 PM2018-11-18T12:04:17+5:302018-11-18T12:20:02+5:30

ब्रिटीशकालीन आणि धोकादायक अवस्थेतील रेल्वे पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

Kalyan's Patri Pool : Brace for Central Railway traffic block due to demolition of Patri Pool today | Kalyan's Patri Pool : कल्याणजवळील पत्रीपुलाचे पाडकाम सुरू

Kalyan's Patri Pool : कल्याणजवळील पत्रीपुलाचे पाडकाम सुरू

googlenewsNext

कल्याण -  ब्रिटीशकालीन आणि धोकादायक अवस्थेतील रेल्वे पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सकाळी 11. 12वाजता पूर्वेकडील एक स्पॅन उचलण्यात आला असून आता पश्चिम बाजूकडील स्पॅन उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते. यात हा पूल धोकादायक असल्याचे समोर आल्याने सप्टेंबरपासूनच या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली होती, बाजूकडील केडीएमसीच्या उड्डाणपूलावरुन सद्यस्थितीला वाहतूक सुरू आहे. दरम्यान पत्रीपूलाचे पाडकाम बघण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बाजूकडील पूलावर झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन विभाग तैनात ठेवण्यात आले आहे.  

पूर्वेकडील स्पॅन उचलण्याचं काम

पश्चिमेकडील स्पॅन उचलण्याचं काम

दरम्यान, पत्रीपूल पाडकामाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर रविवारी (18 नोव्हेंबर) सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या ६ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या काळात कल्याण-डोंबिवली स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नसल्याने रस्ते वाहतुकीवर ताण येणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटी, एसटी आणि वाहतूक पोलिसांनी तयारी केली आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली तसेच कल्याण ते कसारा-कर्जतदरम्यान रेल्वेची वाहतूक सुरू राहणार आहे.

- ब्लॉकदरम्यान उपनगरीय गाड्या कल्याण आणि कर्जत-कसारादरम्यान धावतील
- विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि डोंबिवली/ ठाणेदरम्यान चालवण्यात येतील
- सीएसएमटी, दादर आणि कुर्ला, घाटकोपर, ठाणे आणि डोंबिवलीदरम्यान सेवा वेळापत्रकानुसार चालतील
- सीएसएमटी येथून शेवटची फास्ट ट्रेन कर्जतसाठी सकाळी 8.16 वाजता आणि कल्याणसाठी सकाळी 9.18 वाजता सुटेल
- दादर स्थानकाहून स्लो ट्रेन ही टिटवाळासाठी सकाळी 8.07 वाजता आणि कल्याणसाठी  9.17 वाजता सुटेल
- सीएसएमटीसाठी शेवटची फास्ट ट्रेन आणि अप ट्रेन सकाळी 9.09 वाजता कल्याणावरुन सुटेल
- सीएसएमटीसाठी शेवटची स्लो ट्रेन आणि अप ट्रेन सकाळी 9.13 वाजता कल्याणवरुन सुटेल

रद्द करण्यात आलेल्या गाड्या 
1. मनमाड-एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस 
2. मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस 
3. भुसावळ-मुंबई पॅसेंजर
4. मनमाड-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस 
5. पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
6. पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन
7. जालना-दादर-जालना-जनशताब्दी एक्स्प्रेस
8. मुंबई-भुसावळ पॅसेंजर 19 नोव्हेंबर रोजी रद्द असेल

Web Title: Kalyan's Patri Pool : Brace for Central Railway traffic block due to demolition of Patri Pool today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.