कल्याण-डोंबिवलीत फेरीवाले मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 03:04 AM2019-01-10T03:04:36+5:302019-01-10T03:04:54+5:30

कारवाईचा उरला नाही धाक : स्कायवॉकही आंदण; चालायचे कसे? पादचाऱ्यांचा सवाल

Kalyan-Dombivali Ferrari Mokat | कल्याण-डोंबिवलीत फेरीवाले मोकाट

कल्याण-डोंबिवलीत फेरीवाले मोकाट

Next

कल्याण : पुनर्वसन रखडले असून केडीएमसीने फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील ‘स्कायवॉक’ आंदण दिल्याचे दिसत आहे. आमचे कुणीही काहीच वाकडे करू शकत नाही, अशी उर्मट भाषा कल्याणमधील फेरीवाले वापरत आहेत. तरीही, डोंबिवलीत ‘फ’ प्रभागाच्या पथकातील कर्मचाºयांदेखत स्कायवॉकवर त्यांचे व्यवसाय बिनदिक्कत सुरू असल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.

२०१४ मधील सर्व्हेनुसार केडीएमसीच्या हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. फेरीवाल्यांची संख्या दिवसाला वाढतच आहे. त्यातच सर्व्हेत आढळून आलेल्या फेरीवाल्यांना महापालिका ओळखपत्रे देणार आहे. याबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत होती. पण, ओळखपत्र देण्याच्या कार्यवाहीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे. त्याची अंमलबजावणी करताना फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकाकडून थातूरमातूर कारवाई सुरू असताना कल्याण व डोंबिवलीतील स्कायवॉकवर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास अप्रत्यक्ष मुभा देऊन प्रशासनाने न्यायालयाचा अवमान केला आहे. कल्याणमधील स्कायवॉक रेल्वेच्या पादचारी पुलाला लागून असल्याने प्रतिदिन लाखो प्रवासी त्याचा वापर करतात. स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकवर प्रारंभी फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत होते. आता हा पसारा थेट एसटी डेपोलगत असलेल्या स्कायवॉकपर्यंत पोहोचला आहे. फेरीवाल्यांसह त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणारेही काही अंशी दोषी आहेत. फेरीवाले स्कायवॉकचा अर्धा भाग व्यापत असल्याने चालायचे कसे, असा प्रश्न पादचाºयांना पडला आहे.

‘तो’ कर्मचारी कोण?: डोंबिवली स्कायवॉकवरील अतिक्रमण पाहता केडीएमसीच्या ‘फ’ प्रभागातील पथकातील कर्मचाºयांच्या कारवाईवरच साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान, या पथकातील एक कर्मचारी स्कायवॉकवर व्यवसाय करण्यासाठी हप्ते वसूल करत असल्याचे काही फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. हप्ते न दिल्यास बळजबरीने शर्टाच्या तसेच पॅण्टच्या खिशात हात घालून पैसे हिसकावत असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कारवाईमुळे रोजीरोटीवर गदा येत असल्याने नाइलाजास्तव त्या कर्मचाºयाचा त्रास सहन करावा लागतो, याकडेही त्यांच्याकडून लक्ष वेधण्यात आले. दरम्यान, स्कायवॉकवर ठाण मांडणारा आणि हप्ते गोळा करणारा ‘तो’ कर्मचारी कोण, ‘त्या’ कर्मचाºयावर प्रशासन कारवाई करणार का? स्कायवॉक हे अतिरिक्त उत्पन्नाचे साधन बनले आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

‘फ’ प्रभागातील पथकाचे दुर्लक्ष
च्कल्याणमधील स्थिती आता हळूहळू डोंबिवलीतही निर्माण होऊ लागली आहे. प्रारंभी रात्री उशिरा या स्कायवॉकवर ‘बाजार’ मांडला जायचा, पण आता दिवसाढवळ्याही याठिकाणी अतिक्रमण होऊ लागले आहे.
च्‘फ’ प्रभागाच्या अखत्यारित येणाºया या स्कायवॉककडे प्रभागातील पथकाचे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे. बुधवारी सायंकाळी पथकातील एक कर्मचारी स्कायवॉकवर असतानाही फे रीवाले बिनदिक्कत व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत होते.
च्अधूनमधून ‘ग’ प्रभागातील पथकातील कर्मचाºयांकडून याठिकाणी कारवाई सुरू होती, पण ‘फ’ प्रभागाच्या पथकातील कर्मचाºयांनी त्यांना कारवाई करण्यास मज्जाव केल्याची सूत्रांची माहिती आहे.

Web Title: Kalyan-Dombivali Ferrari Mokat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.