शनिवारी ठाण्यात रंगणार कच्छी पागडी कोणा शिरे? कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 03:51 PM2018-07-11T15:51:40+5:302018-07-11T15:54:30+5:30

गेली १२ वर्षे विविध क्षेत्रांत नैपुण्य दाखविणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात आला आहे. यंदाही येत्या शनिवारी हा सोहळा पार पडणार आहे.

Kachhari pagadi ke jhare ke shine ke shahin tha Program | शनिवारी ठाण्यात रंगणार कच्छी पागडी कोणा शिरे? कार्यक्रम

शनिवारी ठाण्यात रंगणार कच्छी पागडी कोणा शिरे? कार्यक्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कच्छ पागडी कोणा शिरे?’ या कार्यक्र माचे आयोजन विविध क्षेत्रांत नैपुण्य दाखविणाºया व्यक्तींचा, तज्ज्ञांचा सत्कारसांस्कृतिक कार्यक्र माचेही आयोजन

ठाणे: कच्छी नवीन वर्ष आषाढी बीजचे औचित्य साधून कच्छ अस्मिता मंच या संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही ‘कच्छ पागडी कोणा शिरे?’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १४ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्र म होईल, अशी माहिती कार्यक्र माचे आयोजक सुरेश गडा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
      कच्छ अस्मिता मंचाचे यंदाचे १२ वे वर्ष आहे. ‘कच्छ पागडी कोणा शिरे?’ या शिर्षकाखाली विविध क्षेत्रांत नैपुण्य दाखविणाºया व्यक्तींचा, तज्ज्ञांचा सत्कार करण्यात येतो. २००६ ते २००७ या कालावधीत एकूण ५७ व्यक्तींचा मंचच्यावतीने सत्कार करण्यात आला आहे. यंदाही हा सोहळा आयोजित केला असून तो येत्या शनिवारी पार पडणार आहे. या कार्यक्र माला शिवसेना सचिव अनिल देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे, महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, खा. राजन विचारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्र मात कच्छ समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्र माचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी कच्छ समाजबांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्र माला उपस्थित रहावे असे सुरेश गडा यांनी आवाहन केले आहे.

Web Title: Kachhari pagadi ke jhare ke shine ke shahin tha Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.