जेसल पार्क येथील जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 08:35 PM2018-01-21T20:35:57+5:302018-01-21T20:36:23+5:30

भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्कजवळील जुगाराचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून, १० जणांना अटक केली आहे.

Junkel Park's gambling house destroyed | जेसल पार्क येथील जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त

जेसल पार्क येथील जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त

googlenewsNext

मीरा रोड - भाईंदर पूर्वेच्या जेसल पार्कजवळील जुगाराचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून, १० जणांना अटक केली आहे. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांनी उपनिरीक्षक डी. डी. कदम, पोलीस कर्मचारी झांजे, अहिरे, बांगर आदींसह माधव पार्क चाळमध्ये जुगाराचा अड्डा चालत असल्याच्या माहितीवरून शनिवारी सायंकाळी धाड टाकली.

त्यावेळी तेथे तीन पत्त्यांचा जुगार चालत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलीसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याखाली चालक इंद्रपाल रामसब मौर्यासह चंद्रकांत द्वारकानाथ तन्ना, जतीन संख्ये, मजहर मोहम्मद सिद्दिकी शेख, अंकुर रमाकांत सराफ, नवीन सूर्यकांत बाथम, जॅक्सन जॉसफ डिमेकर, नवीन मुक्ताराय बेलेले, टिमोटी खैरोबिन बेगम, होसिल झारखंडेरा कनोजिया या १० जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून ११ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

Web Title: Junkel Park's gambling house destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.