...तर पाणी पुनर्वापराची वेळ येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:01 PM2019-06-10T23:01:59+5:302019-06-10T23:02:20+5:30

पांडुरंग अमृतकर : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’वर व्याख्यान

... it will not be time to reuse water | ...तर पाणी पुनर्वापराची वेळ येणार नाही

...तर पाणी पुनर्वापराची वेळ येणार नाही

Next

अंबरनाथ : कोकणात प्रचंड पाऊस पडतो. या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवल्यास भरपूर पाणी मिळून पाणीटंचाई भासणार नाही. तसेच इस्रायलप्रमाणे पाण्याचा पुनर्वापर करण्याची वेळही येणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता पांडुरंग अमृतकर यांनी व्यक्त केला.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’साठी मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि नगरसेविका अपर्णा भोईर यांनी रविवारी सायंकाळी कार्यक्र म आयोजित केला होता. यामध्ये अमृतकर यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या आधी खुशी खैरनार, पूर्वा पाटील, कृपा डोंगरे, सिद्धी सावंत आणि आभा गोखले या युवतींनी ‘निसर्गाची लूट केल्याने टंचाई झाली, आता पाणी अडवा’ हे पथनाट्य सादर करून भविष्यातील धोक्याकडे लक्ष वेधले.
अमृतकर म्हणाले की, आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे तीन ऋतू आहेत. जगात असे ऋतुचक्र क्वचितच आढळेल. कोकणात जास्त पाऊस पडतो. सध्या निसर्गाचे चक्र उलटे फिरू लागले आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष होत असल्याने पाऊस हळूहळू कमी होत आहे. जलचक्र ही नैसर्गिक शक्ती आहे. त्यात ढवळाढवळ केल्याने दिवसेंदिवस पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी वर्षा जलसंचयन करणे आवश्यक आहे, असे पांडुरंग अमृतकर यांनी सांगितले.
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांनी हे जलसंकट आधीच ओळखले होते. त्यांनी ४० वर्षांपूर्वी राजस्थानसारख्या वाळूच्या प्रदेशात विहिरी व कूपनलिका पुनर्भरणाचे काम सुरू केले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता त्या वाळवंटाच्या प्रदेशात मुबलक पाणी उपलब्ध असल्याचे अमृतकर म्हणाले.
विहीर पुनर्भरण करण्याची चळवळ भक्तीच्या मार्गाने सुरू केली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेला अध्यात्म आणि धार्मिक जोड दिल्यास ही चळवळ अधिक जोमाने फैलावेल, असा विश्वास अमृतकर यांनी व्यक्त केला.
अपुरा पाऊ स आणि जमिनीत पाणी मुरत नसल्याने दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. आपण आतापासूनच हालचाल केली नाही तर भविष्यात ही परिस्थिती आणखी भीषण होऊ न बसेल आणि तेव्हा आपल्या हाती काहीच नसेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

एकही थेंब वाया जाऊ देऊ नका!
पाणी अडवण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. काँक्रि टीकरण वाढल्याने पाणी जिरत नाही. सरकारी योजना राबवण्यात येतात. मात्र, त्यातही अनेक तांत्रिक बाबी अडथळा ठरतात. निवासी सोसायटीच्या आवारातून एकही थेंब बाहेर जाऊ देणार नाही, असा निश्चयच प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे, असे अमृतकर यांनी सांगितले. छतावरून येणारे सर्व पाणी जमिनीत मुरवून धरतीमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, ही खरी ईश्वरसेवा असल्याचे अमृतकर यांनी सांगितले.

Web Title: ... it will not be time to reuse water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.