सत्तेत सगळ्यानांच वाटा देणे शक्य नाही - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 03:00 PM2018-09-12T15:00:28+5:302018-09-12T15:04:49+5:30

सत्तेत सगळ्यांना वाटा देणे शक्य नसल्याचे मत रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तर कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी भर दिला पाहिजे अशी भावनाही त्यांनी ठाण्यात व्यक्त केली.

It is not possible to give all the share in power - Ramdas Athavale | सत्तेत सगळ्यानांच वाटा देणे शक्य नाही - रामदास आठवले

सत्तेत सगळ्यानांच वाटा देणे शक्य नाही - रामदास आठवले

Next
ठळक मुद्देवर्धापनदिनासाठी सज्ज राहण्याचे आवाहनगावा गावात पक्षाच्या शाखा काढण्यावर भर द्या

ठाणे - रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला मंत्री पदानंतर महाराष्ट्रात महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पद दिले आहे. तत्पूर्वी महिला आयोगाचे एक सदस्यपदही दिले आहे. मात्र या दोन पदाने समाजाचे काहीही भले होणार नाही, त्याकरिता आणखी महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लागली जावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण जास्तीत कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची आपली इच्छा असली तरी सगळ्यांनाच खुश करता येणार नाही, अशी कबुली सामाजिक न्यायमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली.
         पक्षासोबत एकनिष्ठ राहणारे हजारो कार्यकर्ते आहेत. त्या सगळ्यांच्या बळावरच मला मंत्रीपद मिळाले आहे. याची कबुलीही त्यांनी दिली. तर पक्षाला जातीच्या बाहेर काढून गावात पक्षाच्या शाखा काढण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिला पाहिजे. सर्व जातीचा त्यामध्ये समावेश असायला हवा असेही उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले. ३ आॅक्टोबर रोजी पक्षाचा ६१ वा वर्धापन दिन ठाण्यात होत आहे. त्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले. पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्यावर वर्धापन दिनाची मोठी जबाबदार असल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे असेही आठवले म्हणाले. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ओरिनस्ट सभागृहात राष्ट्रीय कार्यकारणी आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष, प्रमुख पदाधिकाºयांची नुकतीच बैठक झाली. त्याबैठकीत आठवले मार्गदर्शन करीत होते. यावेळी सर्व जिल्हाध्यक्षांनी त्यांची मते मांडली.
तर महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी निर्माण करण्यात आले असल्याने या महामंडळाच्या कारभाराला कसल्याही प्रकारचा कलंक लागू देणार नाही, असे सांगतानाच या महामंडळामार्फत मागासवर्गीय समाजातील ज्या घटकाला गरज आहे. त्याची शहानिशा करूनच त्याला कर्ज दिले जाईल असे प्रतिपादन महामंडळाचे नविनर्वाचित अध्यक्ष तथा रिपाइंचे राष्ट्रीय सचिव राजाभाऊ सरवदे यांनी केले. महामंडळावर त्यांची वर्णी लागताच ते या पदाचा पदभार घेतल्यानंतर ठाण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.


 

Web Title: It is not possible to give all the share in power - Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.