इशरत जहाँचा मुद्दा पदवीधरमध्ये तापला; शिवसेनेचा आरोप, भाजपाचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:51 AM2018-06-24T00:51:08+5:302018-06-24T00:51:12+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात गुजरातेत एन्काऊंटरमध्ये मारलेली गेलेली कथित दहशतवादी इशरत जहाँचा मुद्दा शिवसेनेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी तापवला.

Ishrat Jaita's issue was raised in graduation; Shiv Sena's allegations, BJP's reply | इशरत जहाँचा मुद्दा पदवीधरमध्ये तापला; शिवसेनेचा आरोप, भाजपाचे प्रत्युत्तर

इशरत जहाँचा मुद्दा पदवीधरमध्ये तापला; शिवसेनेचा आरोप, भाजपाचे प्रत्युत्तर

googlenewsNext

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात गुजरातेत एन्काऊंटरमध्ये मारलेली गेलेली कथित दहशतवादी इशरत जहाँचा मुद्दा शिवसेनेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी तापवला. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी इशरतच्या घरी जाऊन एक लाख रुपयांचा धनादेश दिला होता. त्याचा उल्लेख करुन मोरे म्हणाले की, ज्यांनी दहशतवादी लोकांना मदत केली त्यांच्या मुलाला भाजपाने तिकीट दिले. भाजपाचे नेते व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या आरोपांचे खंडन करताना इशरतला मदतीचा धनादेश देण्यामागे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची प्रेरणा असल्याचा दावा केला. पालघर पाठोपाठ कोकण पदवीधरच्या निवडणुकीतही शिवसेना रडीचा डाव खेळत असल्याचे चव्हाण म्हणाले.
मोरे म्हणाले की, डावखरे यांनी दहशवाद्यांना मदत केली व राष्ट्रप्रेमाची भाषा करणाऱ्या भाजपाने त्यांच्याच मुलाला निरंजनला उमेदवारी दिली. ज्या वसंत डावखरे यांनी निरंजनला मोठे केले, त्यांचा एक साधा फोटो बॅनरवर लावण्याची धमक त्यांच्यात का नाही, असा सवालही त्यांनी केला. केवळ वडिलांच्या पुण्याईवर उमेदवारी मिळालेल्या निरंजन यांना लोकांकरिता अंगावर घेतलेल्या केसेसचे काय महत्व असणार, असा प्रश्न त्यांनी केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजपाने वर्षाला दोन कोटी नोकºया देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात आतापर्यंत ४० ते ५० लाख लोकांचा रोजगार बुडाला. ५० हजारांच्यावर शासकीय शाळा बंद झाल्याचा त्यांनी दावा केला. शिक्षण हा सुदृढ समाजाचा, देशाच्या प्रगतीचा पाया असून विद्यार्थी आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठीच शिवसेना मैदानात उतरली असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना प्रत्येक निवडणुकीत रडीचा डाव खेळते. २०१४ मध्ये मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्याविरोधात शिवसेनेने सीडी काढली होती, त्यानंतर पालघर पोटनिवडणुकीच्या वेळी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची काटछाट केलेली सीडी दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. आताही तोच प्रयत्न सुरु आहे, असे चव्हाण म्हणाले. वसंत डावखरे यांचे फोटे बॅनवर नसल्याबद्दल विचारले असता निरंजन म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांना बॅनरचे काम सोपविण्यात आले होते, त्यांनीच हे बॅनर लावले.
संजय मोरे यांच्यावर महापालिका शाळांतील सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीपोटी तीन कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचार केला म्हणूनच त्यांना शिवसेनेने या निवडणुकीची बक्षिसी दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Web Title: Ishrat Jaita's issue was raised in graduation; Shiv Sena's allegations, BJP's reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.