आयपीएलवर सट्टा; तीन बुकींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:53 AM2018-05-18T05:53:14+5:302018-05-18T05:53:14+5:30

आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या तीन बुकींना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. त्यापैकी दोन आरोपी डोंबिवलीचे आहेत.

IPL betting; Three bookies arrested | आयपीएलवर सट्टा; तीन बुकींना अटक

आयपीएलवर सट्टा; तीन बुकींना अटक

Next

ठाणे : आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या तीन बुकींना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. त्यापैकी दोन आरोपी डोंबिवलीचे आहेत.
आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा घेणारे काही बुकी डोंबिवलीत सक्रिय असल्याची माहिती ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नितीश पुंजाणी याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचे दोन साथीदार डोंबिवलीत सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी डोंबिवलीतून पोलिसांनी आरोपींची माहिती घेतली. तेथील प्रगती महाविद्यालयाजवळच्या एका दुकानामध्ये आरोपींचा धंदा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. गौतम मुरगी सावला आणि निखिल जेठमल संपत यांना अटक करण्यात आली. दोघेही मोबाइलवर सट्टा घ्यायचे.

Web Title: IPL betting; Three bookies arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.