ठाणे - रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच महापालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्तनगर परिसरामध्ये ठाणे महापालिकेने उभारलेल्या दोस्ती संक्र मण शिबिरांमध्ये लाभार्थींऐवजी त्यांनी ठेवलेल्या पोट भाडेकरूंकडून सदनिकांचे वापर होत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या होत्या. पालिकेचे उपअभियंता याबाबतची उपअभियंता प्रदीप घाडगे, दोस्ती रेंटल हाऊसिंगचे व्यवस्थापक रत्नाकर सातपुते आणि दर्शना सावरकर यांच्या पथकाने अचानकपणे २१ आॅगस्ट रोजी धाड टाकून तपासणी केली होती. याच तपासणीमध्ये लाभार्थींनी पोट भाडेकरू ठेवून त्यांच्याकडून दुप्पट भाडे आकारणी करून सदनिका दिल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी लाभार्थी तबसुम जबार, मुरतुजा जबार, एम.डी. मुबीन, सुलताना मुबीन, शाहिन कुरेशी तसेच जिहंद कुरेशी यांच्या घरांमध्ये अनुक्र मे जगदीश जुदिकया, नंदा ठाकूर आणि प्राची खाडे वास्तव्य करीत असल्याचे आढळले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील रस्ता रु ंदीकरण आणि अन्य विकास प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना संक्र मण शिबीरांमध्ये धाडण्यात आले आहे. वर्तकनगर परिसरामध्ये दोस्ती संक्र मण शिबीर असून तेथे महापालिकेने अनेकांना सदनीका उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन हजार रु पयांच्या शुल्कावर या सदनिका देण्यात आल्या असून संक्र मण शिबीर म्हणून या भागात सदनिका दिल्या जातात. काही सदनिकांमध्ये लाभार्थींनी स्वत: ऐवजी पोट भाडेकरून ठेवल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार मालमत्ता विभागातील उप अभियंता प्रदीप घाडगे यांनी धाड टाकल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या पोटभाडेकरूंकडून ४ ते ५ हजारांचे भाडे घेतले जात होते. महापालिकेच्या परवानगीशिवाय ही सदनिका परस्पर भलत्याच व्यक्तीला देऊन महापालिकेचा विश्वासघात केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.