टाऊनहॉलच्या त्रुटी दूर करण्यासाठी कलाकारांनी मांडल्या सूचना, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद, बैठक संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:52 PM2018-09-22T15:52:52+5:302018-09-22T15:56:25+5:30

टाऊन हॉलच्या त्रुटी दूर करण्यासाठी कलाकारांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडल्या सूचना मांडल्या.

Instructions made by artists to remove the error of the townhall, the collector gave positive feedback, concluded the meeting | टाऊनहॉलच्या त्रुटी दूर करण्यासाठी कलाकारांनी मांडल्या सूचना, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद, बैठक संपन्न

टाऊनहॉलच्या त्रुटी दूर करण्यासाठी कलाकारांनी मांडल्या सूचना, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद, बैठक संपन्न

googlenewsNext
ठळक मुद्देटाऊनहॉलच्या त्रुटी दूर करण्यासाठी कलाकारांनी मांडल्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सकारात्मक प्रतिसादयेत्या डिसेंबरमध्ये टाऊन हॉल नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे. - विजू माने

ठाणे : कला, संस्कृतीचे केंद्र ओळखल्या जाणाºया टाऊन हॉलमध्ये असलेल्या त्रुटी दूर होऊन त्यात सुधारणा व्हाव्या यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मराठी कलाकार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मराठी कलाकरांनी सुचना मांडल्यावर टाऊन हॉलमध्ये सुधारणा करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. टाऊन हॉल सांस्कृतिक दर्जाचे व्यासपीठ कसे उभे राहील याचे विचारमंथन या बैठकीत करण्यात आले.
       डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी मराठी कलाकार सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्याचप्रमाणे या टाऊन हॉलमध्ये सध्या जाणवत असलेल्या त्रुटीही दूर व्हाव्या यासाठी मराठी कलाकार पुढे सरसावले आहेत. टाऊन हॉलमध्ये अधिक सोयी सुविधा वाढविणे तसेच याठिकाणी कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणे, उत्तमोत्तम व दर्जेदार स्वरूपाचे कार्यक्र म या हॉलमध्ये तसेच खुल्या प्रेक्षागृहात व्हावे यासाठी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी ठाण्यातील कलावंतांच्या संस्थेबरोबर चर्चा केली. यावेळी कलावंतांनी आवश्यक त्या सूचना केल्या. हॉल वातानुकूलित करणे, स्वच्छता, ध्वनिरोधक बसविणे, प्रकाश योजना, उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था याबाबतीत तसेच या हॉलचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने करणे अशा अनेक सूचना केल्या. ठाण्यातील कलाकारांना तालमीसाठी जागेचा प्रश्न येतो, हॉलची जागा यासाठी उत्तम आहे असे मत काही जणांनी व्यक्त केले. याठिकाणी कार्यक्र म आयोजित करून ही जागा लोकिप्रय कशी होईल तेही नियोजन करण्यात येत असून ठाण्यातील सांस्कृतिक शान ठरावी असे आ. संजय केळकर यांनी देखील सुचिवले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जिल्हाधिकºयांना या ऐतिहासिक वास्तूबाबत सूचना केल्या आहेत.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, विजू माने, मंगेश देसाई, उदय सबनीस, सदाशिव टेटविलकर, रविकांत पटवर्धन, सदाशिव कुलकर्णी, प्रा. प्रदीप ढवळ, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर, तवटे आदींची उपस्थिती होती.
---------------------------------------
आम्ही सुचना मांडल्यावर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी अ‍ॅक्टीव्ह सहकार्य दाखविले आहे. येत्या डिसेंबरमध्ये टाऊन हॉल नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे.
- विजू माने, दिग्दर्शक

Web Title: Instructions made by artists to remove the error of the townhall, the collector gave positive feedback, concluded the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.