ठाणे स्थानकातील जुन्या पुलाच्या दुरुस्तीऐवजी रेल्वे बांधणार नवा पूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:03 AM2019-04-25T01:03:23+5:302019-04-25T01:03:37+5:30

अधिकाऱ्यांनी केली पाहणी; प्रवाशांना करावी लागणार काही महिने प्रतीक्षा

Instead of repairing the old bridge in Thane station, the new bridge will be constructed on the railways. | ठाणे स्थानकातील जुन्या पुलाच्या दुरुस्तीऐवजी रेल्वे बांधणार नवा पूल!

ठाणे स्थानकातील जुन्या पुलाच्या दुरुस्तीऐवजी रेल्वे बांधणार नवा पूल!

Next

ठाणे : ठाणेरेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक २ आणि १० नंबरला जोडणाºया कल्याणकडील जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ते रखडल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच मंगळवारी अचानक रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या पुलासह स्टेशनची पाहणी के ली. या पाहणीत पूल दुरुस्त करून काही उपयोग असून तो नव्यानेच उभारणी करण्याशिवाय पर्याय नाही, यावर अधिकाºयांचे एकमत झाले आहे. मात्र, ते आधी कागदावर नंतर प्रत्यक्षात काम सुरू होईपर्यंत प्रवाशांना आणखी काही महिने येजा करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१९७२ साली प्रवाशांसाठी सुरू झालेल्या ठाणे रेल्वेस्थानकातील कल्याणकडील जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम २ फेब्रुवारीपासून दोन टप्प्यांत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. हे काम तब्बल ६९ दिवसांत पूर्ण होणार होते. मात्र, ते २ ऐवजी २३ फेब्रुवारीला सुरू झाल्यानंतर फलाट क्रमांक २, ३, ४, ५ या ठिकाणच्या पुलाचे नादुरुस्त बांधकाम पाडण्यात आले. त्यानंतर, रखडले आहे. याबाबत, लोकमतने हॅलो ठाणेमध्ये २२ फेब्रुवारीला ‘जुन्या पुलाच्या दुरुस्तीची रखडपट्टी’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन मंगळवारी सायंकाळी अचानक मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक पनवार, वरिष्ठ मंडळ (इस्टेट) इंजिनीअर गर्क, वरिष्ठ मंडळ सुरक्षा अधिकाºयांनी या पुलासह रेल्वेस्थानकाची पाहणी केली. याचदरम्यान, तो दुरुस्त केला तरी जास्त काळ तग धरेल, असे वाटत नाही. त्याऐवजी नवीनच पूल उभारावा लागेल, असे सांगून याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

नव्या पुलावरून एक नंबर फलाटावर येण्यास बंदी
सीएसएमटीकडे नव्याने उभारलेला पूल हा फलाट क्रमांक १ ते १० असा जोडण्यात आला आहे. फलाट क्रमांक १ वर येजा करण्यासाठी पार्किंग प्लाझा येथे जिना आहे. तो प्लाझाचे काम सुरू असल्याने गुरुवारपासून जवळपास महिनाभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी फलाट क्रमांक २ च्या जिन्याचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पुन्हा उभारण्यासाठी करावी लागणार निविदा प्रक्रिया
दुरुस्तीच्या कामाबाबत निविदा प्रक्रिया काढली, तशीच पुन्हा नव्या पुलाच्या उभारणीसाठी नवीन निविदा प्रक्रिया करावी लागेल. तत्पूर्वी त्यासाठी निधी मंजुरीची आवश्यकता आहे. त्यामुळे तूर्तास तरी आणखी काही महिने प्रवाशांचे हाल होतील, असेच यावरून स्पष्ट होत आहे.

Web Title: Instead of repairing the old bridge in Thane station, the new bridge will be constructed on the railways.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.