इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे- किरण पुरदंरे  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 08:25 PM2017-11-19T20:25:40+5:302017-11-19T20:26:02+5:30

इंदिरा प्रिय दर्शनी पुरस्कार माणसांना दिला जातो. खरे तर हा पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे. कारण पक्षी जंगल तयार करतात. मनुष्य जंगल निर्माण करू शकत नाही, असे मत राष्ट्रीय ख्यातीचे पक्षीमित्र किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.

Indira Priyadarshini award should be given to birds - Kiran Puradan | इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे- किरण पुरदंरे  

इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे- किरण पुरदंरे  

Next

डोंबिवली- निसर्गात अनेक झाडे नकळत येत असतात. ती झाडे पक्ष्यांनी वाढविलेली असतात. पक्षी फळे खातात. त्यापासून दूर जाऊन त्यांची विष्ठा फैलाविलेली दिसते. बीज प्रसार होतो. निसर्गातील  विविध घटकांनी , पक्ष्यांनी ती झाडे लावलेली असतात. इंदिरा प्रिय दर्शनी पुरस्कार माणसांना दिला जातो. खरे तर हा पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे. कारण पक्षी जंगल तयार करतात. मनुष्य जंगल निर्माण करू शकत नाही, असे मत राष्ट्रीय ख्यातीचे पक्षीमित्र किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले.
    सवाई कट्टा यांच्यातर्फे  स.वा. जोशी विद्यालयाच्या पटांगणात ‘‘पक्ष्यांच्या दुनियेत फेरफटका’’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पुरंदरे बोलत होते. तब्बल 1क्क् हून अधिक पक्ष्यांचे हुबेहुबे आवाज काढणा:या पुरंदरे यांनी अनेक पक्ष्यांचे आवाज काढून प्रेक्षकांची दाद मिळविली. यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
    पुरंदरे म्हणाले, पक्ष्यांची निर्मिती सुमारे 15 कोटी वर्षापूर्वी झाली आहे. अंगावर पिसे आहे, त्याला चोच आहे, साधारणपणो उडणारा त्याला पक्षी म्हणतात. पक्ष्यांचा रंग , आकार वेगवेगळा आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ते वेगवेगळे आवाज करतात. पक्षी वेगवेगळ्य़ा ठिकाणी सापडतात. झाडावर, जंगलात, मनुष्यवस्तीच्या आसपास आणि पाण्यात आढळतात. भारतात 13क्क् जातीचे पक्षी आढळतात. पक्ष्यांना संरक्षणासाठी निसर्गाने काहीतरी दिले आहे. पक्षी ज्या अवयवांचा जास्तीत जास्त वापर करतात त्याचा जास्तीत जास्त विकास होतो. पक्षांचे डोळे लहान असतात तरी देखील त्यांनी जमिनीत चोच घुसविली की त्याठिकाणी काय आहे ते त्यांना समजते. स्पर्शाने पक्षी भक्ष्य शोधून काढू शकतात. कारण त्यांची चोच संवदेनशील असते. वटवाघूळ एका दिवसात 8क् किमी प्रवास करतात. कारण त्यांचे पंख शक्तीशाली असतात. पक्षी कोणत्या पर्यावरणात राहतात. त्यावर ते किती वर्ष जगणार हे ठरते. पक्ष्यांचे अन्न काय आहे हे शोधले की ते कुठे राहतात हे शोधता येते. आपल्याकडे अनेक लहान- मोठे पक्षी आढळतात. निसर्गात ते महत्त्वाचे भूमिका बजावित असतात. म्हणून त्यांना पाहिले पाहिजे. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांचे संरक्षण केले पाहिजे. पक्ष्यांची विष्ठेचा वापर उत्तम खत म्हणून केला जाऊ शकतो. त्यांची विष्ठा, जीवामृत आणि त्यावर पेंडा टाकल्यास ते उत्तम खत होते. त्यावर कोणतेही प्रक्रिया करावी लागत नाही. त्यामुळे जमीन सुपीक होते. पक्षी अंडी ठेवण्याची सुरक्षित जागा म्हणून घरटयाकडे पाहतात. धामण सुगरणांची घरटय़ात जाऊन अंडी खातात. किडय़ाच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम पक्षी करतात. गरूडाचे घरटे 16 फूट उंच होते. त्याच घरटय़ाच्या खाली इतर पक्षीही राहतात. निसर्गातील कोणतेची गोष्ट काढून टाकू नका. म्हणोच त्यांची घरटी काढू नका. पक्षी आपल्या घरटय़ांना प्लॉस्टिक वापरू लागले आहे हे आढळून आले आहे. सलीम अली यांचे बुक ऑफ इंडियन बर्डस हे पुस्तक वाचायला खूप चांगले आहे. कारण त्यांनी स्वत: निरीक्षण करून ते पुस्तक लिहीले आहे, असे ही पुरंदरे यांनी सांगितले. 

Web Title: Indira Priyadarshini award should be given to birds - Kiran Puradan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.