वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीचा निषेध, काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:05 AM2018-01-30T07:05:33+5:302018-01-30T07:05:48+5:30

पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ लवकरच भाजपा सरकारने कमी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सोमवारी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आला.

 Increasing petrol, diesel, gas pricing, Congress front | वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीचा निषेध, काँग्रेसचा मोर्चा

वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीचा निषेध, काँग्रेसचा मोर्चा

Next

कल्याण : पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ लवकरच भाजपा सरकारने कमी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सोमवारी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आला.
दरवाढीबाबत भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाणhttp://www.lokmat.com/topics/ashok-chavan/ यांच्या आदेशानुसार काँग्रेसने कल्याण तहसील कार्यालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला. पश्चिमेतील सहजानंद चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. तो महंमद अली चौकातून जाऊन तहसीलदार कार्यालयावर धडकला. या वेळी मोर्चेकरी बैलगाड्या आणि टांगे घेऊन आले होते. बैलगाडीवर दुचाकी ठेवण्यात आली होती. काँग्रेसचे आमदार संजय दत्त आणि कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. नायब तहसीलदार अभिजित खोले यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढीच्या मुद्यासह बेरोजगारी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांकडेही मोर्चात लक्ष वेधण्यात आले होते. या मोर्चात दत्त आणि पोटे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक नेते आर.बी. सिंह, प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते ब्रीजकिशोर दत्त, कल्याण शहर जिल्हा महिलाध्यक्षा कांचन कुलकर्णी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव, प्रदेश पदाधिकारी संतोष केणे, केडीएमसीतील पक्षाचे गटनेते नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल पंडित, माजी नगरसेविका शारदा पाटील, रत्नप्रभा म्हात्रे, परिवहनचे माजी सदस्य आरिफ पठाण, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अमित म्हात्रे, परिवहनचे माजी सभापती गंगाराम शेलार, शकील खान आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपाने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्याबाबत, त्यांच्या मनातील रोष मोर्चात व्यक्त केल्याचे पोटे यांनी सांगितले.

सरकार निष्क्रिय

केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना पेट्रोल, डिझेल भाव ४० ते ५० प्रतिलीटर रुपयांपर्यंत होते. त्यावेळी भाजपाची मंडळी विरोधाची भूमिका घेत. परंतु, आज जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. भाजपा सरकार निष्क्रिय ठरले असून नागरिक त्रस्त आहेत, असे दत्त यांनी सांगितले.

Web Title:  Increasing petrol, diesel, gas pricing, Congress front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.