खाण्याबाबत प्राण्यांचे अनुकरण करा- जगन्नाथ दीक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:24 AM2019-03-12T00:24:46+5:302019-03-12T07:16:17+5:30

खाण्याच्या बाबतीत प्राण्यांचे अनुकरण केले, तरी माणसांचे निम्मे आजार कमी होतील, असा विश्वास डॉ. जगन्नाथ विनायक दीक्षित यांनी व्यक्त केला.

Imagine animals regarding food: Jagannath Dixit | खाण्याबाबत प्राण्यांचे अनुकरण करा- जगन्नाथ दीक्षित

खाण्याबाबत प्राण्यांचे अनुकरण करा- जगन्नाथ दीक्षित

Next

बदलापूर : पोट भरल्यावर प्राणी अजिबात काही खात नाही. पण, मनुष्य हा एकमात्र असा प्राणी आहे, जो पोट भरल्यावरदेखील खात असतो. अशा प्रकारे अनावश्यक खाल्ल्यानेच अनेक व्याधी वाढत असतात. यामुळे खाण्याच्या बाबतीत प्राण्यांचे अनुकरण केले, तरी माणसांचे निम्मे आजार कमी होतील, असा विश्वास डॉ. जगन्नाथ विनायक दीक्षित यांनी व्यक्त केला.

काका गोळे फाउंडेशनतर्फे आरोग्याविषयी जनजागृतीसाठी डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अलीकडे कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. याबाबतीत चर्चा केल्यावर असे आढळले आहे की, लठ्ठपणा कमी झाला, तर कॅन्सर बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. त्यामुळेच विनासायास वेट लॉस हे आपले तत्त्व असल्याचे दीक्षित म्हणाले.

आपण चर्चा पुष्कळ करतो, त्यापेक्षा प्रयोग करा. आपल्या परंपरा, धर्म, आयुर्वेद यात आहे तेच महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाने दोन वेळा जेवायचे सांगितले आहे. जैन धर्मात ब्यासना असते, तर गौतम बुद्धाने एकदाच जेवावे, असे म्हटल्याचे दाखले त्यांनी दिले. संस्कृतमध्ये ब्रेकफास्टला पर्यायी शब्दच नाही. कारण, नाश्ता हा प्रकारच आपल्याकडे नसल्याचेही ते म्हणाले.

लठ्ठपणामुळे अनेक व्याधी होत असतात. म्हणूनच, आपण ठरवले तर वर्षभरात आपले वजन कमी होऊ शकते. लठ्ठ होणाऱ्यांमध्ये ९८ टक्के स्वत:मुळे लठ्ठपणा वाढतो. साखर, तूप, आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे, कमी शारीरिक श्रम यामुळे याचा त्रास वाढत असल्याचेही ते शेवटी म्हणाले.

आरोग्याविषयी जागरुक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलो आणि इतकी प्रचंड गर्दी पाहून अंगावर मूठभर मांस चढले आहे. मात्र, हे मांस पोटावर येऊ नये, अशी आशा दीक्षित यांनी भाषणाच्या प्रारंभी व्यक्त केली. आपण इतक्या ठिकाणी कार्यक्रम केले, पण केवळ नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, या एकाच उद्देशाने काका गोळे फाउंडेशनने हे व्याख्यान आयोजित केले आहे, हे पाहून मनाला समाधान वाटल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Imagine animals regarding food: Jagannath Dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.