शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना मीरा-भाईंदर महापालिकेकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 07:49 PM2018-08-15T19:49:07+5:302018-08-15T19:53:27+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना  महाराष्ट्र शासनाच्यावतीने 25 लाख रुपये आणि मीरा भाईंदर महापालिकेच्यावतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती महापौर डिंपल मेहता यांच्या पालिका कार्यलयातून देण्यात आली आहे.

help to martyred indian soldier major kaustubh rane family | शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना मीरा-भाईंदर महापालिकेकडून मदत

शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना मीरा-भाईंदर महापालिकेकडून मदत

googlenewsNext

मीरारोड : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना  महाराष्ट्र शासनाच्यावतीने 25 लाख रुपये आणि मीरा भाईंदर महापालिकेच्यावतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती महापौर डिंपल मेहता यांच्या पालिका कार्यलयातून देण्यात आली आहे.
महापौर डिंपल मेहता यांच्या पालिका कार्यालयातून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात आमदार नरेंद्र मेहता यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाच्यावतीने 25 लाख रुपयांची रक्कम मेजर यांच्या कुटुंबीयांना जाहीर केली. महापालिकेकडून 11 लाख रुपयांची रक्कम जाहीर करत आयुक्तांना तसा प्रस्ताव दिल्याचे महापौरांच्यावतीने पत्रकात म्हटले आहे .
मीरारोडच्या शीतलनगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे यांचं गेल्या 7 ऑगस्टच्या पहाटे जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी लढताना शहीद झाले. 

Web Title: help to martyred indian soldier major kaustubh rane family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.