मलेशियातील 'गॉडफादर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:43 AM2018-08-19T03:43:44+5:302018-08-19T03:43:48+5:30

पर्यटनाच्या नावावर घुसखोरी करणाऱ्यांचे प्रमाण मलेशियात वाढल्याने या ठिकाणी गुन्हेगारी दिवसागणिक फोफावत आहे.

'Godfather' in Malaysia | मलेशियातील 'गॉडफादर'

मलेशियातील 'गॉडफादर'

Next

- पंकज पाटील

डोंबिवलीतील रोहन वैद्य आणि कौस्तुभ वैद्य हे दोघे तरुण व्यावसायिक कामानिमित्त मलेशियात गेले होते. त्यांचा फ्रोजन फिशचा व्यवसाय असल्याने त्यांचे या देशात सातत्याने येणेजाणे सुरू होते. मात्र, दि. ३ आॅगस्टला त्यांचे मलेशियात अपहरण करून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांकडून एक कोटीची मागणी केली गेली. मात्र, या अपहरणाचा संबंध हा त्यांच्या व्यवसायाशी निगडित असल्याचे स्पष्ट झाले. अपहरणकर्त्यांनी या दोघांना सोडताना मलेशिया, थायलंड, फिलिपाइन्स या देशांत परत दिसू नका, असे बजावले. व्यावसायिक स्पर्धेमुळे हे अपहरण करून त्यांना त्रास दिल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, मलेशियातील कायदे पाहता अपहरणासारखा गुन्हा हा गंभीर समजला जातो. या गुन्ह्याकरिता जन्मठेपेची शिक्षा आहे. असे असतानाही उद्योजकांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने या देशातील स्थायिक तामिळ भाषकांपैकी कोणीतरी हा प्रकार केल्याची शक्यता आहे. या अपहरणाच्या निमित्ताने मलेशियातील पर्यटन व अन्य व्यवसाय व तेथील सुरक्षेचा घेतलेला आढावा...

दक्षिण आशियाई खंडातील पर्यटन केंद्रांपैकी एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणजे मलेशिया. मलेशियाने आपली आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी ज्या उपाययोजना आखल्या आहेत, त्यातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणजे पर्यटन. के.एल. टॉवर असो वा टिष्ट्वन टॉवर... हे दोन्ही टॉवर आजही मलेशियाची ओळख जपून आहेत. पर्यटकांना कोणताही त्रास मलेशियात होणार नाही, याची काळजी मलेशियन पोलीस घेत असतात. मात्र, पर्यटनाच्या नावावर घुसखोरी करणाऱ्यांचे प्रमाण मलेशियात वाढल्याने या ठिकाणी गुन्हेगारी दिवसागणिक फोफावत आहे. मलेशियात गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती या कडक कायद्यांनाही पोखरण्याचे काम करत आहे.
जगाच्या नकाशावरील महत्त्वाच्या पर्यटन केंद्रांपैकी एक देश म्हणजे मलेशिया. दुसºया महायुद्धानंतर स्वातंत्र्य प्राप्त करणाºया देशांपैकी एक देश म्हणजे मलेशिया. १९५७ साली मलेशियाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यानंतर देशात लोकशाही राज्य प्रस्थापित झाले. देशाची आजची लोकसंख्या सरासरी तीन कोटी २० लाखांच्या घरात आहे. त्यात ५४ टक्के लोकसंख्या ही स्थानिक ‘मलेय’ या वंशाची आहेत. मलेय भाषेचे प्रभुत्व असलेल्या या देशात चिनी आणि भारतीयांची संख्यादेखील मोठी आहे. एकूण लोकसंख्येच्या सात टक्के लोकसंख्या भारतीयांची आहे. त्यातही बहुसंख्य भारतीयांमध्ये तामिळ भाषक मोठ्या संख्येने या देशात वास्तव्यास आहेत. तर, २२ टक्के लोकसंख्या ही चिनी आहे. स्वातंत्र्यापूर्वीपासून तामिळ भाषिक या देशात वास्तव्यास असल्याने त्यांना मलेशियन नागरिकत्व प्राप्त झाले आहे. एवढेच नव्हे तर मलेशियाच्या लोकशाहीप्रवाहात अनेक भारतीय वंशाचे लोक नेतृत्वही करत आहेत. मलेशियातील बहुसंख्य नागरिक हे मुस्लिम असल्याने मुस्लिम राष्ट्रांपैकी एक राष्ट्र म्हणून ओळखले जाते. मलेशियाचे मूळ नागरिक असलेला मलेय संप्रदाय हा मुस्लिम असला तरी धर्माचा जास्त प्रभाव या ठिकाणी दिसत नाही. धर्माचे उदात्तीकरण न करता आपली जीवनशैली जगण्याची पद्धती आत्मसात करण्यात आलेली आहे. हिंदू जनसमुदायालाही त्यांच्या परंपरेप्रमाणे राहण्याची सोय या ठिकाणी आहे. मुरगनस्वामींची उंच मूर्ती याच मलेशियात उभारण्यात आलेली आहे. हे धार्मिक क्षेत्र मलेशियातील पर्यटन केंद्रांपैकी एक आहे. शिपिंग, फिशिंग यासोबत मोठी औद्योगिक वसाहत या ठिकाणी उभी राहिली आहे. सोबत, पेनांग आणि कलांग या दोन महत्त्वाच्या समुद्रबेटांवरून शिपिंगचा मोठा व्यवसाय सुरू आहे. देशात रबर आणि पाल्म ट्री आॅइलचा मोठा व्यवसाय सुरू आहे. जगातील समृद्ध देशांच्या यादीमध्ये मलेशियाचा तेविसावा क्रमांक लागतो. देशाच्या उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी परदेशांतून कामगार मागवावे लागतात. इंडोनेशिया, फिलिपाइन्स, तैवान या देशांतील बहुसंख्य नागरिक मलेशियात कामगार म्हणून काम करतात.
मलेशिया हे राष्ट्र जगाच्या नकाशावरील महत्त्वाचे राष्ट्र असले, तरी या देशातील अंतर्गत सुरक्षेला पोखरण्याचे काम केले जात आहे. गुन्हेगारीचे वाढते प्रमाण ही मलेशियासाठी डोकेदुखी ठरत आहे. स्थानिक मलेय नागरिक असो वा त्या ठिकाणी राहणारे तामिळ भाषिक असो, हे सर्व गुन्हेगारीकडे वळत असल्याने मलेशिया या सर्वांना आवरण्याचा प्रयत्न करत आहे. गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत. गंभीर गुन्ह्यांना या ठिकाणी मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. मात्र, असे असले तरी या ठिकाणची गुन्हेगारी ही वाढतच आहे. आर्थिक सुबत्ता असली, तरी अजूनही देशातील एक वर्ग गरिबीरेषेखाली आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. देशातील महत्त्वाच्या गुन्ह्यांपैकी एक म्हणजे मानवीतस्करी आणि अमली पदार्थांची तस्करी. या दोन्ही तस्करींचे देशासमोरील आव्हान मोठे आहे. रोजगारासाठी असंख्य नागरिक आपापल्या देशांतून या ठिकाणी येतात, मात्र ते पुन्हा आपल्या मायदेशी जात नसल्याने बेकायदेशीर वास्तव्य करणाºयांची संख्या वाढत आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर देशभर काम करत आहेत. स्थानिक नागरिक या क्षेत्रात काम करण्यास तयार होत नसल्याने मानवीतस्करीच्या माध्यमातून या ठिकाणी बांधकाम आणि इतर क्षेत्रात कामगार म्हणून त्यांचा वापर केला जात आहे. मलेशियातील एकूण लोकसंख्येच्या दोन ते तीन टक्के लोकवस्ती ही मानवीतस्करीतून देशात आलेली आहे. त्यांना या देशात राहण्याचे अधिकार नसतानाही ते राहत आहेत. मलेशियात बेकायदा वास्तव्य करणारे हे कामगार देशाची गरज झाली आहे. मानवीतस्करीतून मोठ्या प्रमाणात महिला या देशाच्या रहिवासी आहेत. पर्यटन केंद्र असल्याने मलेशियातील नाइटलाइफसाठी या महिलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. नाइटलाइफसाठी लागणाºया महिलांची तस्करी ही मलेशियात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. फिलिपाइन्स, इंडोनेशिया, तैवान, व्हिएतनाम, चीन, म्यानमार आणि थायलंड या देशांतील बहुसंख्य महिलांना बेकायदा मलेशियात आणण्यात येते. या महिलांना मलेशियात नाइटलाइफच्या निमित्ताने देहविक्रयाला जुंपले जाते. पर्यटनातून मिळणाºया अमाप पैशांमुळे मलेशियाने या तस्करीकडे विशेष लक्ष दिलेले नाही. मात्र, ही महिलांची तस्करी दिवसागणिक वाढत असल्याने आता मलेशियाने त्यावर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कठोर कारवाईला सुरुवात केलेली आहे. मानवीतस्करीतून देशात आलेले लोक गुन्हेगारीकडे वळल्याने त्याचा त्रास मलेशियाला सहन करावा लागत आहे. मलेशियातील महत्त्वाच्या शहरांपैकी कौलालम्पूर आणि पेनांग या शहरांचा विचार करता या दोन्ही शहरांच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था सरकारने केलेली आहे. या ठिकाणची गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहे. किमान मोठ्या शहरांत येणाºया पर्यटकांना आणि उद्योजकांना कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी या देशात घेतली जात आहे. मात्र, त्यातही काही घटना घडल्यास त्याला योग्य शासन करण्याचे काम येथील कायदा व्यवस्था करत आहे. अमली पदार्थांची तस्करी ही या देशासमोरील मोठी समस्या झाली होती. आता या तस्करीला आळा घालण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीत सापडलेल्या आरोपीला देहदंडाची शिक्षा देण्यात येते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांच्या तस्करीला लगाम लावण्यात यश आले आहे. मात्र, तस्करी पूर्णपणे बंद झालेली नाही, हेही वास्तव आहे.
मलेशियात गुन्हेगारी टोळ्या मोठ्या प्रमाणात आहेत. मलेय गुन्हेगारांसोबत या देशात तामिळ गुन्हेगारही मोठ्या प्रमाणात आहेत. हे गुन्हेगार मानवी, अमली पदार्थांची तस्करी यांच्यासोबत हप्तेवसुलीचे कामदेखील करतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या टोळीतील गुन्हेगार अपहरणासारखे गंभीर गुन्हे करण्यात तरबेज आहेत. स्थानिक उद्योजक असो वा परदेशातील उद्योजक, अपहरणाचे अनेक प्रकार या देशात यापूर्वी घडले आहेत. पर्यटकांना लुटण्याचे किंवा त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार या ठिकाणी घडतात. विशेषकरून रात्रीच्या वेळी ही गुन्हेगारी वाढलेली असते. या गुन्हेगारांना आळा घालण्यात सुरक्षा व्यवस्थेला अपयश आले आहे. मलेशियात अनेक गुन्हेगार वास्तव्यास आले आहेत. मात्र, परदेशांतून आलेल्या या गँगस्टर्सवर सरकारी यंत्रणेचे विशेष लक्ष असते. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बाधा निर्माण होणार नाही, याची हमी घेतली जाते. मलेशिया गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे.

मलेशियात विनापासपोर्ट सापडलेली व्यक्ती ही मोठी गुन्हेगार समजली जाते. तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई करताना व्यक्तीची सर्व माहिती घेतली जाते.

सिंगापूरमार्गे क्रूझने मलेशिया विनापासपोर्ट दाखल होणे सहज शक्य आहे. सिंगापूरहून मलेशियातील पेनांग आणि कलांग या पोर्टवर क्रूझ आल्यावर त्या पर्यटकांना कोणतीही परवानगी न घेता थेट मलेशिया फिरता येते. त्यासाठी पासपोर्ट सोबत घेण्याची गरज भासत नाही.

मलेशियातील पोलीस पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी

Web Title: 'Godfather' in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.