डोंबिवली शहरात ब्ल्यू रीव्होल्युशनची झलक    

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 02:12 PM2018-01-18T14:12:22+5:302018-01-18T14:12:45+5:30

कल्याण-डोंबिवली ह्या शहरांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा पुढे चालवत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डोंबिवली येथे प्रथमच एका आगळ्या वेगळ्या मत्स्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.

A glimpse of Blue Revolution in Dombivli city | डोंबिवली शहरात ब्ल्यू रीव्होल्युशनची झलक    

डोंबिवली शहरात ब्ल्यू रीव्होल्युशनची झलक    

googlenewsNext

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली ह्या शहरांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा पुढे चालवत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डोंबिवली येथे प्रथमच एका आगळ्या वेगळ्या मत्स्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. आजच्या आधुनिक युगात सृष्टीत निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीकडे व्यापक व पुरोगामी दृष्टीने पहायला हवे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास लक्षात घेता उतेकर फिशरीज प्रा.लि. आयोजित आणि दिष्टी मिडिया संयोजित AQUA Dombivli ह्या मत्स्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.  
दिनांक २४ जानेवारी ते २८ जानेवारी २०१८ ह्या पाच दिवसांच्या कालावधीत डोंबिवली क्रीडा संकुल येथील स्व.सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृह येथे हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्रौ ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. प्रदर्शनात सागरी, गोड्या तसेच खाऱ्या पाण्यातील मासे व त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रोपिकल आणि चिक्लीड, ओर्नामेंटल फिशेस, इनव्हर्टस आणि अक्वाटिक प्लांट्स इत्यादी अनेक प्रकारचे जलचर पहायला मिळतील ह्या बरोबरच मत्स्यालयासंबंधी आवश्यक उपकरणे, मत्स्यालयासाठी आकर्षक सजावट साहित्य, विविध एक्सेसरीज येथे पहायला मिळतील. 

 जेलीफिश, कटल फिश, ओक्टोपस ह्यांचे दर्शन तसेच तज्ञान्मार्फत विविध विषयांवर कार्यशाळा, व्याख्याने हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे. सदर प्रदर्शन हे कल्याण व डोंबिवली मधील ३०० पेक्षा अधिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता अचंबित करणारे पाण्याखालील विश्व घेऊन येत आहे. ह्या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक उतेकर फिशरीज प्रा.लि. हि संस्था भारतातील फिशरीज उद्योगातील एक अग्रगण्य संस्था आहे. संस्थेचे संस्थापक.रुपेशकुमार सकपाळ ह्यांनी स्वत: फिशरीज इंडोक्रोनोलॉजि मधील स्पेशलायजेशन, फिशरीज पथोलोजी, फिशरीज इकोनोमिक्स, ह्या सर्व विषयांत प्राविण्य मिळविले आहे.     

कल्याण-डोंबिवलीकरांनी जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती लावून ह्या निळ्याशार सागरातील रंगीबेरंगी जग बघण्यास नक्की यावे असे आवाहन आयोजक व संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.   

Web Title: A glimpse of Blue Revolution in Dombivli city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.