शासनाचे लक्ष वेधन्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यात पाळला लक्षवेध दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 07:33 PM2019-06-27T19:33:26+5:302019-06-27T19:42:26+5:30

मागण्यांवर त्वरीत निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अन्यथा ९ जुलै रोजी गांधीजींच्या पुतळ्याजवळ मुंबई येथे मौन दिन पाळण्याचा निर्णय यावेळी अधिका-यांनी घेतला.

Gazetted officers in the Thane district observe the daylight in the district | शासनाचे लक्ष वेधन्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यात पाळला लक्षवेध दिन

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिका-यांनी प्रमुख मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्याकडे सुपुर्द केले

Next
ठळक मुद्देकेंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावाकेंद्राप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन राजा मिळावीएक लाख ७५ हजार रिक्त पदे त्वरीत भरावेत

ठाणे : प्रलंबित प्रश्नांसंबंधात शासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनाचे लक्ष वेधन्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयांमध्ये गुरूवारी लक्षवेध दिन पाळला. यावेळी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. यानंतर राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिका-यांनी प्रमुख मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्याकडे सुपुर्द केले.
केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे. डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे करा. एक लाख ७५ हजार रिक्त पदे त्वरीत भरावेत. महिला कर्मचा-यांना केंद्राप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन राजा मिळावी, या मागण्यांचे निवेदन लक्षवेध दिना निमित्त निवासी उपजिल्हाधिका-यांना सुपूर्द केले. मागण्यांवर त्वरीत निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अन्यथा ९ जुलै रोजी गांधीजींच्या पुतळ्याजवळ मुंबई येथे मौन दिन पाळण्याचा निर्णय यावेळी अधिका-यांनी घेतला. या लक्षवेध दिनाच्या कार्यक्रमात महिला दुर्गा मंचच्या अध्यक्षा मनाली तांबडे, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष शहाजी पाटील, उप अध्यक्ष मोहन पवार, कोकण विभागीय महिला संघटक डॉ. तरु लता धानके, ठाणे जिल्हा समन्वय सचिव डॉ.अविनाश भागवत आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Gazetted officers in the Thane district observe the daylight in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.