भिवंडीतील कचरागाड्या ‘अनफिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:58 PM2019-06-10T22:58:49+5:302019-06-10T22:59:33+5:30

महापालिकेची ठेकेदारांना नोटीस : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

Frozen trash 'unfinished' in bhiwandi | भिवंडीतील कचरागाड्या ‘अनफिट’

भिवंडीतील कचरागाड्या ‘अनफिट’

googlenewsNext

भिवंडी : महापालिकेच्या कचरा ठेकेदाराच्या गाड्या अनफिट असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्याबाबत, तक्रारी वाढल्याने महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कचरा ठेकेदारांना नोटीस बजावली. त्यांना कचरा वाहून नेणाऱ्या गाडीची आरटीओसंबंधित सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पालिकेच्या कचरा ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. मात्र, शहरातील या भंगारगाड्यांकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

महापालिकेच्या एकूण पाच प्रभाग समितीअंतर्गत ९० प्रभाग आहेत. या प्रत्येक प्रभागातील कचरा उचलण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कचरा ठेकेदाराकडून एक घंटागाडी सुरू केली आहे. अशा प्रकारे ९० घंटागाड्या शहरातील प्रत्येक प्रभागातून कचरा गोळा करतात. यापैकी बºयाच गाड्या नादुरुस्त व जुन्या भंगार झालेल्या आहेत. यातील काही गाड्यांचे आरटीओकडून पासिंगही झालेले नाही. अनेक चालकांकडे लायसन्स आणि गाडीचे इन्शुरन्स काढलेले नाही. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न पुढे येत आहे.
महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य विभागातील कचरा ठेकेदार व घंटागाडीबाबतचा भ्रष्ट कारभार सर्वश्रुत आहे. बºयाचदा या गाड्या विद्यमान नगरसेवक अथवा माजी नगरसेवकांमार्फत लावलेल्या असतात. ते कमीतकमी खर्चाच्या जुन्या आणि भंगार गाड्या आपल्या कार्यकर्त्यांमार्फत पालिकेत लावतात आणि त्याचे बिल काढतात. प्रभागात नेमलेल्या गाड्यांनी त्या प्रभागातील कचरा नियमित उचलला पाहिजे, असे आदेश आहेत. मात्र, अनेक ठिकाणी कचरा तसाच पडून असतो. रविवार व पालिकेच्या सुटीच्या दिवशी कचरा उचलला जात नाही. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन बिल मिळवले जाते. शहरात अशा भंगारगाड्या चालवण्यासाठी काही नगरसेवक वाहतूक पोलिसांवर दबाव टाकतात, त्यामुळे वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात भंगारगाड्यांमार्फत कचरा उचलला जात आहे; मात्र आरोग्य अधिकारी,आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांच्याकडून त्याची पाहणी होत नसल्याने लहानमोठे अपघातही होत आहेत. दोन वर्षांत तीन जणांचा कचरागाडीच्या अपघातांत जीव गेला आहे. २९ मे रोजी नागाव रोड, गॅलक्सी टॉकीजसमोर कचरागाडीखाली आल्याने लहान मुलाचा जीव गेला होता. त्यापूर्वी खंडूपाडा येथेही घंटागाडीखाली आल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोग्य विभागातील अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे या कचरागाड्या नागरिकांच्या जीवावर उठल्याने नागरिकांनी पालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. याबाबत, महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाºयांना कचरा ठेकेदार व गाडीचालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश
च्महापालिकेत घंटागाडीच्या नावाने ठेक्यावर चालणाºया गाड्यांची प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांच्याकडून तपासणी करून पासिंगचे प्रमाणपत्र व वाहनांच्या फिटनेसचे सर्टिफिकेट पालिकेत जमा करावेत.
च्अन्यथा, ती वाहने बंद करण्यात येतील, अशी नोटीस ठेकेदार व गाडीचालकांना दिली आहे, असे महापालिका आरोग्य विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी सांगितले.

Web Title: Frozen trash 'unfinished' in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.