चार हजार नागरिक २८ तास विजेविना, खांब पडल्याचे निमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 12:55am

बदलापूर शहरात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकदा नागरिकांना बसत असतो.

बदलापूर : बदलापूर शहरात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकदा नागरिकांना बसत असतो. गुरुवारी बदलापूर पश्चिमेतील पोखरकरनगर भागात क्रेनच्या धडकेत दोन खांब पडल्यानंतर तब्बल १० तासांनी त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. मात्र, रात्री उशीर झाल्याने काम थांबवण्यात आले. त्यामुळे २४ तासांहून अधिक काळ चार हजारांहून अधिक नागरिकांना विजेविना राहावे लागले. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. बदलापूरमध्ये महावितरणच्या कारभारामुळे नव्याने येथे आलेल्या नागरिकांना त्रास होत आहे. निवासी संकुलात विविध प्रकारच्या सोयीसुविधा असल्या, तरी विजेविना त्याचा फायदा शून्य आहे. यातच गुरुवारी पश्चिमेतील पोखरकरनगरच्या रस्त्याला असलेल्या विजेच्या खांबांना एका खाजगी क्रेनची धडक लागल्याने दोन खांब पडले. त्यामुळे दुपारी दीडच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी क्रे नमालकाने दुरुस्तीचे आश्वासन दिले खरे, मात्र काही वेळातच त्याने घटनास्थळावरून पोबारा केला. त्यामुळे महावितरणच्या संबंधित अभियंत्याने पोलीस ठाणे गाठत तक्र ार दिली. मात्र, तक्र ार देण्यात एक अभियंता अडकलेला असताना वरिष्ठ अधिकाºयाने या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे होते. मात्र, चार हजार नागरिकांच्या विजेचा प्रश्न सोडवण्याऐवजी बैठकांचे सोपस्कार पार पाडण्यात वरिष्ठ अभियंते अडकले होते. त्यामुळे तक्र ार करून रात्री १० च्या सुमारास टोकावडे येथून आलेल्या दुरुस्ती पथकाने खांब उभे करण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत विजेचे खांब उभे करण्याचे काम झाले. मात्र, उच्चदाब वाहिन्या घटनास्थळाच्या बाजूने जात असल्याने वीजवाहिन्या टाकणे शक्य नसल्याचे सांगत काम थांबवण्यात आले. त्यामुळे पोखरकरनगर, पाटीलनगर येथील जवळपास चार हजार नागरिकांना फटका बसला. वीज नसल्याने पाण्याचे नियोजनही कोलमडले. शुक्र वारी जवळपास सर्वच घरांत ठणठणाट होता. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

संबंधित

येत्या शुक्रवारी थीम पार्क आणि बॉलीवुड पार्क चौकशी समितीची पहिली बैठक
डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा खोदकाम; नागरिकांमध्ये नाराजी
शुल्लक कारणावरून हाणामारी, पाच जणांना अटक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांची पाठ
...तर दिवाळीत कचरा उचलणार नाही

ठाणे कडून आणखी

येत्या शुक्रवारी थीम पार्क आणि बॉलीवुड पार्क चौकशी समितीची पहिली बैठक
डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा खोदकाम; नागरिकांमध्ये नाराजी
शुल्लक कारणावरून हाणामारी, पाच जणांना अटक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांची पाठ
...तर दिवाळीत कचरा उचलणार नाही

आणखी वाचा