माजी आमदार मेंडोन्सा यांचे निष्ठावंत माजी नगरसेवक भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 10:14 AM2018-03-22T10:14:02+5:302018-03-22T10:14:02+5:30

माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या खास मर्जीतले निष्ठावंत मानले जाणारे माजी नगरसेवक भगवती शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपात प्रवेश केलाय.

Former loyalist Madondo's former loyalist corporator, BJP | माजी आमदार मेंडोन्सा यांचे निष्ठावंत माजी नगरसेवक भाजपात

माजी आमदार मेंडोन्सा यांचे निष्ठावंत माजी नगरसेवक भाजपात

Next

मीरा रोड - माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या खास मर्जीतले निष्ठावंत मानले जाणारे माजी नगरसेवक भगवती शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपात प्रवेश केलाय. मेंडोन्सा यांना मेहतांनी धक्का दिल्याचे मानले जातेय. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे, तर शर्मा हे मेंडोन्सांसोबत असले तरी आतून मेहतांच्या संपर्कात असल्याच्या आरोपांचा मेंडोन्सा समर्थकांनी पुनरुच्चार केलाय .

मीरा-भार्इंदर महापालिकेत भगवती शर्मा हे राष्ट्रवादीतुन नगरसेवक म्हणुन निवडुन आले होते. गटनेता पदाची जबाबदारी देतानाच पालिकेतली सूत्रं देखील तेच सांभाळत होते. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या मर्जीतले म्हणून ओळख असलेले भगवती २०१२च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी मेंडोन्सा यांनी त्यांना स्वीकृत नगरसेवक केले होते.

भगवती शिवाय मेंडोन्सा यांचे पान हलत नसे असे बोलले जायचे. कोणाला भेटायचे, काय नियोजन करायचे यापासून अनेक जबाबदा-या ह्या मोठ्या विश्वासाने मेंडोन्सा हे भगवती यांच्यावरच टाकायचे.

मेंडोन्सा यांचे कट्टर समर्थक पण नरेंद्र मेहतांचे विरोधक मानले जाणारया भगवती यांच्यावर काही मेंडोन्सा समर्थक मात्र त्यावेळी नेहमीच नाराज असायचे. भगवती आतुन मेहतांना मिळाल्याचे आरोप देखील केले जात होते. पण मेंडोन्सा यांनी भगवती यांना नेहमीच जवळ ठेवले . मेंडोन्सां सोबत ते देखील शिवसेनेत गेले होते. आॅगस्ट २०१७ च्या पालिका निवडणुकीत पुन्हा त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान बुधवारी भगवती यांनी आमदार नरेंद्र मेहतां सोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व भाजपात प्रवेश केला. त्या नंतर मेहताांसह जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, सभापती ध्रुवकिशोर पाटील, डॉ. राजेंद्र जैन, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, रवी व्यास, रीटा शाह आदिंनी भगवती यांचे स्वागत केले.

त्यांच्या भाजपा प्रवेशा बद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी आतुन मेहतांशी हातमिळवणी होती हे स्पष्ट झाल्याचा दावा केलाय. मेंडोन्सा यांचे राजकिय डावपेच, राजकिय समीकरणं तसेच अंतर्गत बहुतांशी सर्वच माहिती भगवती यांना असल्याने आ. मेहतांना त्याचा चांगलाच फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भगवती यांना स्विकृत नगरसेवक पदाचं आश्वासन देखील भाजपा प्रवेशाच्या बदल्यात देण्यात आल्याची चर्चा आहे.
 

Web Title: Former loyalist Madondo's former loyalist corporator, BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.