वरप आगप्रकरणी पाच जणांना अटक, मांगरूळ आग समाजकंटकांनी पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 03:35 PM2018-11-17T15:35:44+5:302018-11-17T15:37:27+5:30

कल्याणजवळ वरप येथे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या रोपवनात तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथजवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दाखल वन विभागाने घेतली आहे.

Five suspects have been arrested in connection with the fire in ambernath | वरप आगप्रकरणी पाच जणांना अटक, मांगरूळ आग समाजकंटकांनी पेटवली

वरप आगप्रकरणी पाच जणांना अटक, मांगरूळ आग समाजकंटकांनी पेटवली

Next
ठळक मुद्देवरप प्रकरणी पाच आरोपींना अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.मांगरूळ प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मांगरूळ येथील आगीत ७ हेक्टर क्षेत्रातील १२ हजार ६३३ रोपांना आगीची झळ बसली आहे.

ठाणे - कल्याणजवळ वरप येथे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या रोपवनात तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथजवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दाखल वन विभागाने घेतली आहे. वरप प्रकरणी पाच आरोपींना अटक करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मांगरूळ प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा तपास सुरू असल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दोन्ही घटनांमध्ये आगीची झळ पोहचलेल्या रोपांना जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

वरप येथे रोपवनालगत मौजे कांबा येथील तुकाराम आडे, रामू राठोड, अनिल आडे, शुभम आडे, प्रकाश राठोड या व्यक्तींनी शेणाच्या गोवऱ्या थापण्यासाठी जागा साफ केलेली आढळून आली,  तेथूनच आग पसरल्याचे तपास केला असता आढळले. महाराष्ट्र वन नियमावली व वन अधिनियमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून प्रथम वर्ग न्यायालयामार्फत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी घेण्यात आली आहे. वरप येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १८.७ हेक्टर क्षेत्रावर ९ हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ३ हेक्टर क्षेत्र जाळले असून १ हजार रोपांना आगीची झळ पोहचली आहे.

मांगरूळ येथील आगीत ७ हेक्टर क्षेत्रातील १२ हजार ६३३ रोपांना आगीची झळ बसली आहे. याच ठिकाणी डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या आगीत ८ हेक्टर क्षेत्रातील गावात व पालापाचोळा जाळून २० हजार रोपांना झळ बसली होती. त्यानंतर वन विभागाने याठिकाणच्या रोपांना अति तातडीने पाणी देण्यासाठी बोअरवेल घेणे, मोटार वासाविणे, वीज पुरवठा करणे  यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ६ लाख ७२ हजार ५०० रुपये खर्च केला होता. या रोपवनात मे २०१८ पर्यंत जिवंत रोपांची टक्केवारी ८२ टक्के होती. या रोपवनाच्या रखवालीसाठी २ रखवालदारही नेमले आहेत. याठिकाणी गावात कापणे, जाळ रेषा घेण्याचे काम बदलापूर वन क्षेत्रपाल यांनी सुरु केले होते. पावसाळ्यानंतर दाट वाढलेले गवत काढण्याचे, निंदनी व बेणणी करण्याचे नियोजनही  केल होते. याकामासाठी दिवाळीमुळे स्थानिक मजूर न मिळाल्याने बाहेरून मजूर आणून कामे सुरू केली होती, मात्र या ठिकाणी काही समाजकंटकांनी परत आग लावली. या वनातील मृत होणाऱ्या झाडांना वाचविण्यासाठी पाईपलाईनने पाणी देण्यात येत आहे तसेच दाट वाढलेले गावात काढण्याचे काम परत सुरू केले आहे. ज्या क्षेत्रात आग लागली नाही तिथे ९१ टक्के रोपं जिवंत असून हे पालकमंत्री आणि खासदार यांच्या पुढाकाराने व मेहनतीने लावलेले रोपवनदेखील वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे असेही डॉ रामगावकर यांनी सांगितले.

Web Title: Five suspects have been arrested in connection with the fire in ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.