दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला VIP ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी 5 पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 12:08 PM2018-10-27T12:08:49+5:302018-10-27T13:23:36+5:30

खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Five police personnel including a sub-inspector suspended for providing preferential treatment to Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar in Thane jail | दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला VIP ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी 5 पोलीस निलंबित

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला VIP ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी 5 पोलीस निलंबित

ठाणे - खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. 


उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार अशी करवाई करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने खंडणी प्रकरणी कासकर याला जेरबंद केले आहे. सध्या कासकर हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे. गुरुवारी त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचे एका व्हायरल व्हिडीओ दिसत आहे. त्या व्हायरल व्हिडिओची गंभीर दाखल घेत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कासकर याला रुग्णालयात नेणाऱ्या पाच पोलिसांनी त्याला जास्त वेळ बाहेर ठेवणे आणि त्याच्या बाबतीत हयगई केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट दिसत आहे. त्यानुसार त्या पाच पोलिसांना निलंबित केले आहे.तसेच त्यांची सखोल  चौकशीचे ही करण्याचे आदेश दिले आहे. असे पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Five police personnel including a sub-inspector suspended for providing preferential treatment to Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar in Thane jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.