पाणी दरवाढीचा ठामपावर वार्षिक पाच कोटींचा भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 12:15 AM2018-12-12T00:15:37+5:302018-12-12T00:15:55+5:30

५0 टक्के दरवाढ; मुंबई महापालिकेकडून अद्याप पत्रव्यवहार नाही

Five crore rupees annually on the basis of price rise | पाणी दरवाढीचा ठामपावर वार्षिक पाच कोटींचा भुर्दंड

पाणी दरवाढीचा ठामपावर वार्षिक पाच कोटींचा भुर्दंड

- अजित मांडके 

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेने प्रती चौरस फुटाप्रमाणे पाणी बिलांची वसुली सुरु केली असून, येत्या काही महिन्यांत नळांना मीटरही लावले जाणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना अतिरिक्त भूर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. त्यात ठाण्याच्या भरवशावर तहान भागवणाऱ्या मुंबई महापालिकेने आता ठाण्यालाच केल्या जाणाºया पाणी पुरवठ्याच्या दरात ५० टक्के वाढ सुचविली आहे. यासंदर्भातील पत्र अद्याप ठाणे महापालिकेला प्राप्त झालेले नाही. परंतु या दरवाढीतून मुंबई महापालिकेला वार्षिक नफा वाढून मिळणार असला तरी ठाणेकरांना वार्षिक ५ कोटी ११ लाखांचा वाढीव बोजा सहन करावा लागणार आहे.

मुंबई महापालिकेने १५ वर्षानंतर ही दरवाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार सध्याच्या पाणी दरात ५० टक्के वाढ सुचविली आहे. ठाणे महापालिका सध्या विविध स्त्रोतांकडून ४८५ दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. त्यानुसार स्टेमकडून प्रती हजार लीटरमागे ९.५० रुपये, एमआयडीसीकडून प्रती हजार लीटरमागे ९.०० रुपये, तर स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून ४ रुपये दराने पाणी उचलत आहे. मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला ३० दशलक्ष लीटर कच्चे (प्रक्रिया न केलेले) पाणी आणि ३५ दशलक्ष लीटर पक्के (प्रक्रिया केलेले) पाणी पुरविले जात आहे. त्यानुसार ही वाढ पक्या पाण्यावर करण्याचे निश्चित केल्याची माहिती महापालिकेतील सुत्रांनी दिली. मुंबई महापालिकेडून होणाºया कच्या पाण्यासाठी एक हजार लीटरमागे ४ रुपये आणि पक्क्या पाण्यासाठी एक हजार लीटरमागे ८ रुपये ठाणे महापालिका मोजत आहे. याचाच अर्थ एक दशलक्ष लीटरमागे ८ हजार याप्रमाणे ३५ दशलक्ष लीटरमागे दिवसाला २ लाख ८० हजार आणि वर्षाकाठी ही रक्कम १० कोटी २२ लाख एवढी होत आहे.

मुंबई महापालिकेने यात ५0 टक्के वाढ सुचविली असल्याने ठाणे महापालिकेला १ हजार लीटरमागे १२ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे एक दशलक्ष लीटरमागे १२ हजार आणि ३५ दशलक्ष लीटरमागे ४ लाख २० हजार रुपये दिवसाला मोजावे लागणार आहे.

सामान्य ठाणेकरांवर बोजा नाही
दरवाढीमुळे मुंबई महापालिकेला वाढीव उत्पन्न मिळणार असले तरी ठाणे महापालिकेला मात्र हा वाढीव भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
मुंबई महापालिकेने जरी ही दरवाढ सुचविली असली तरी त्यासंदर्भातील पत्र अद्यापही ठाणे महापालिकेला प्राप्त झालेले नाही.
मुंबई महापालिकेचे पत्र प्राप्त झाले तरी यासंदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा करुनच पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. या दरवाढीचा भूर्दंड सामान्य ठाणेकरांवर पडू देणार नसल्याचेही पालिका सूत्रांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेकडून होणारा ६५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा हा ठाण्यातील कोपरी, गावदेवी, टेकडी बंगला आदी भागात होत आहे. आधी ६० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत होता. त्यात नुकतीच पाच दशलक्ष लीटरची वाढ झालेली आहे.

Web Title: Five crore rupees annually on the basis of price rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.