अपहारप्रकरणी पाच वाहक निलंबित, केडीएमटीचा दांडीबहाद्दरांनाही दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 02:52 AM2019-02-07T02:52:28+5:302019-02-07T02:52:43+5:30

केडीएमटीतील १८ चालक, वाहकांना अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन, शिवीगाळ, मद्यपान करून गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असताना पैशांचा अपहार केल्याच्या कारणावरून उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी पाच वाहकांना निलंबित केले आहे.

Five carriers suspended in the case of the attack, KDMT's Dandibahaddar was also attacked | अपहारप्रकरणी पाच वाहक निलंबित, केडीएमटीचा दांडीबहाद्दरांनाही दणका

अपहारप्रकरणी पाच वाहक निलंबित, केडीएमटीचा दांडीबहाद्दरांनाही दणका

Next

कल्याण - केडीएमटीतील १८ चालक, वाहकांना अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन, शिवीगाळ, मद्यपान करून गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असताना पैशांचा अपहार केल्याच्या कारणावरून उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी पाच वाहकांना निलंबित केले आहे. खोडके यांनी दांडीबहाद्दरांविरोधातही कारवाईची मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत तीन महिन्यांत ४२६ कर्मचाºयांविरोधात वेतनकपात आणि ५० रुपये दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

उत्पन्न आणि खर्च यातील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम डबघाईला आला आहे. कर्मचाºयांच्या वेतनासाठीही केडीएमसीवर सर्वस्वी अवलंबून असणाºया केडीएमटी उपक्रमाचे खाजगीकरण हाच एकमेव उपाय आहे. पदाधिकाºयांनी खाजगीकरणाच्या मुद्याकडे लक्ष वेधले असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यातच दुसरीकडे पैशांचा अपहार केल्याप्रकरणी रवी मराठे, चेतन वाघ या दोघा कंत्राटी वाहकांसह संतोष पाटील, राहुल शिंदे, प्रकाश लावंड आदी तिघांना ३१ जानेवारी ते ५ फेबु्रवारीदरम्यान निलंबित करण्यात आले आहे. बसमध्ये विनातिकीट प्रवासी आढळणे आणि कॅशबॅगमध्ये अधिक प्रमाणात कॅश आढळणे आदी ठपके संबंधित वाहकांवर ठेवण्यात आले आहेत.

उपक्रमामध्ये कामचुकार तसेच दांडीबहाद्दर कर्मचाºयांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने याचाही फटका दैनंदिन उत्पन्नाला बसत आहे. त्याची गांभीर्याने दखल घेत तीन महिन्यांत खोडके यांनी ४२६ कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. कर्मचारी ज्या दिवशी गैरहजर राहिले, त्या दिवसाचे वेतन कापून ५० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाºयांना शिस्त लागणे तसेच उपक्रमाचे उत्पन्न वाढवणे, यासाठी ही कारवाई सुरू आहे. मात्र, तरी दांडी मारणाºयांचा आकडा कमी होताना दिसत नसल्याने उपक्रमासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.

निवृत्त अधिका-याची नियुक्ती
ज्यांना पैशांच्या अपहारप्रकरणी निलंबित केले आहे, त्यांची चौकशी करण्यासाठी सरकारी निवृत्त अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालावर कारवाईची पुढील दिशा ठरेल.
जानेवारीमध्ये नोटीस बजावलेल्यांपैकी काही जणांचे खुलासे अद्याप मिळालेले नाहीत. खुलासे प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे केडीएमटी उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Five carriers suspended in the case of the attack, KDMT's Dandibahaddar was also attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.