पाच घरफोड्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:41 AM2018-06-14T06:41:00+5:302018-06-14T06:41:00+5:30

घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पाच अट्टल आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये त्यांनी जवळपास १३ गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

 Five arrests | पाच घरफोड्यांना अटक

पाच घरफोड्यांना अटक

Next

ठाणे : घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पाच अट्टल आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये त्यांनी जवळपास १३ गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
एका घरफोडीच्या प्रकरणाचा तपास करत असताना ठाण्यातील वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना काही अट्टल घरफोड्यांची माहिती मिळाली. त्यानुसार, मालाड येथील राजेश मुग्रेश शेट्टीयार ऊर्फ शेट्टी, विरार येथील संजू तंगराज शेट्टी आणि मुंबईतील व्यंकटेश महादेव शेट्टीयार ऊर्फ टकला ऊर्फ कट्टप्पा यांना पोलिसांनी ७ जून रोजी अटक केली. तिन्ही आरोपींना ठाणे, मुंबईतील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वीही अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर पडले होते. बाहेर पडताच त्यांनी ठाणे, मुंबई परिसरात पुन्हा घरफोड्या सुरू केल्या. श्रीनगर पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या एका गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली आहे. या गुन्ह्यातील काही सोन्याचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २.५० लाखाची घरफोडी केली होती. या गुन्ह्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. राजेश मुग्रेश शेट्टीयार याच्याविरुद्ध आतापर्यंत वीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती जयराज रणवरे यांनी दिली.
वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये पोलिसांनी नालासोपारा येथील कन्हय्यालाल भवरलाल सुथार आणि अहमदाबाद येथील सचिन ऊर्फ जगदीश लक्ष्मण फराट यांना ९ जून रोजी अटक केली. कन्हय्यालाल भवरलाल सुथार याच्याविरुद्ध अंधेरी, चारकोप आणि नालासोपारा पोलीस ठाण्यांमध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी सराईत आहेत. गुजरातमध्ये त्यांनी १३ घरफोड्या केल्या आहेत. त्यापैकी तीन घटनांमध्ये त्यांनी सराफा दुकानांमध्ये चोरी केली होती. आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 

Web Title:  Five arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.