'आमच्या विभागातील रिक्त पदेही भरा!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:40 AM2019-01-29T00:40:27+5:302019-01-29T00:40:36+5:30

केडीएमसीतील रिक्त उपसचिवपद आणि अग्निशमन दलातील काही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे.

'Fill in our section empty spaces!' | 'आमच्या विभागातील रिक्त पदेही भरा!'

'आमच्या विभागातील रिक्त पदेही भरा!'

Next

कल्याण : केडीएमसीतील रिक्त उपसचिवपद आणि अग्निशमन दलातील काही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने सुरू केली आहे. सुरक्षा विभागाला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. सुरक्षा विभागातील रिक्त पदे भरली जात नसतानाच जादा कामाचा मोबदलाही मिळत नाही. सलग तीन-तीन ड्युट्या कराव्या लागत असल्याने ही परवड थांबणार कधी? असा सवाल सुरक्षारक्षक व्यक्त करत आहेत.

उपमुख्य सुरक्षा अधिकारी, सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि वॉचमन, सुरक्षा रक्षक अशी एकूण २६९ पदे मंजूर आहेत. यातील केवळ १७१ पदेच भरण्यात आली आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. उपमुख्य सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवली आहेत. महापालिका मुख्यालय, कल्याणमधील कार्यालये आणि डोंबिवली विभागीय कार्यालय याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. त्यांच्या मदतीला भांडुप सुरक्षा मंडळाचे ३४ सुरक्षारक्षक घेतले आहेत. तर अन्य १०८ कर्मचारी खाजगी स्तरावर सुरक्षा विभागाला सहाय्यक म्हणून नेमले आहेत. त्यांना केवळ अटेंडंट म्हणून घेतले आहे.

रिक्त पदे भरा आणि जादा कामाचा मोबदला मिळावा अशी प्रमुख मागणी सुरक्षारक्षकांची आहे. केडीएमसीतील अग्निशमन दलातील कर्मचाºयांना अतिकालीन भत्ता लागू करण्याबाबत प्रस्ताव एप्रिलमध्ये महासभेत मंजूर झाला. अग्निशमन दल कर्मचाºयांच्या प्रलंबित हक्कांच्या मागण्यांसंदर्भात दोन प्रस्ताव दाखल झाले होते. या कर्मचाºयांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असताना आम्ही काय चूक केली? आमचाही विचार व्हावा, असा सूर सुरक्षा कर्मचारी आळवत आहेत. दरम्यान, सद्य:स्थितीला उपसचिवपद आणि सिस्टीम अ‍ॅनालिसिससह अग्निशमन दलातील फायरमन, लीडिंग फायरमनच्या २४ जागा भरण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आमच्या विभागातील पदे भरावीत, अशी मागणी सुरक्षारक्षक करत आहेत. यासंदर्भात प्रभारी सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी भरत बुळे यांच्याशी संपर्क केला असता अपुºया मनुष्यबळामुळे कर्मचाºयांवर ताण पडत असून ही पदे भरण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार केल्याचे ते म्हणाले.

...तर कार्यवाही होईल!
सद्य:स्थितीला राज्य सरकारच्या धोरणानुसारच एखाद्या विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. तूर्तास तरी सुरक्षा विभागातील रिक्त पदे भरण्याचे प्रयोजन नाही.
सरकारने आदेश दिल्यास केडीएमसीतर्फे त्यासंदर्भात कार्यवाही सुरू करून रिक्त पदे भरली जातील, असे सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद धाट यांनी सांगितले.

Web Title: 'Fill in our section empty spaces!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.