बॅग भरो... निकल पडो...! मीरा-भार्इंदरचे नगरसेवक निघाले टूरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:24 AM2018-04-04T06:24:31+5:302018-04-04T06:24:31+5:30

मीरा- भार्इंदरच्या नागरिकांवर एकीकडे करवाढीचा बोजा टाकतानाच दुसरीकडे पालिका तिजोरीत पैसे नाहीत म्हणून डासांना आळा घालण्यासाठी फवारणी करणाऱ्या १८० कर्मचा-यांना घरी बसवणारे नगरसेवक मात्र नागरिकांच्या पैशावर मजा करण्यासाठी कर्नाटकच्या कूर्ग या पर्यटनस्थळी जाणार आहेत.

 Fill the bag ... Get out! Mira-Bhairinder's corporator went out to tour | बॅग भरो... निकल पडो...! मीरा-भार्इंदरचे नगरसेवक निघाले टूरवर

बॅग भरो... निकल पडो...! मीरा-भार्इंदरचे नगरसेवक निघाले टूरवर

Next

मीरा रोड - मीरा- भार्इंदरच्या नागरिकांवर एकीकडे करवाढीचा बोजा टाकतानाच दुसरीकडे पालिका तिजोरीत पैसे नाहीत म्हणून डासांना आळा घालण्यासाठी फवारणी करणाऱ्या १८० कर्मचा-यांना घरी बसवणारे नगरसेवक मात्र नागरिकांच्या पैशावर मजा करण्यासाठी कर्नाटकच्या कूर्ग या पर्यटनस्थळी जाणार आहेत. अभ्यास दौरा असे नेहमीप्रमाणे गोंडस नाव त्यासाठी दिले गेले असले तरी तब्बल ४५ लाखांची उधळपट्टी करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या साफसफाई, पाणी पुरवठा आदी सेवा तोट्यात असतानाच पालिकेवर विकासकामांसाठी कर्जाचा बोजा असल्याचे कारण सांगून सत्ताधारी भाजपाने नागरिकांवर पाणीपट्टी व मालमत्ता दरात वाढीसह नव्याने मलप्रवाह कर, घनकचरा शुल्क व पाणीपुरवठा लाभ कराचा बोजा मंजूर केला. परंतु एकीकडे थकबाकी वसुली करायची नाही, कार्यक्रम व दालनांसाठी उधळपट्टी तसेच विविध समस्यांची मांदियाळी, अनागोंदी असताना भाजपाने नागरिकांवर मोठ्या प्रमाणात करवाढ लादल्याच्या निषेधार्थ विविध स्तरातून टीकेची झोड उठू लागली. त्यामुळे महासभेत भाजपाने पाणीपट्टी व मालमत्ता दरात वाढीसह घनचकरा शुल्क आकारण्यास मंजुरी दिली.
नागरिकांवर एकीकडे करवाढीचा बोजा टाकताना दुसरीकडे डासांच्या निर्मूलनासाठी फवारणी करणाºया १८० कर्मचाºयांना पैसे नाहीत म्हणून कामावरून कमी करण्यात आले. परंतु दुसरीकडे मात्र स्थायी समितीमध्ये सर्व ९५ नगरसेवकांसाठी अभ्यासदौºयाच्या नावाखाली पर्यटनस्थळी मजेसाठी जाण्याचा ठराव मंजूर केला आहे. कूर्ग येथे हा अभ्यास दौरा जाणार आहे. त्यासाठी ४५ लाखांची तरतूद करून ठेवली आहे. आधी २० ते ३० एप्रिल दरम्यान हा दौरा काढण्याचे ठरवले होते. परंतु अनेक नगरसेवकांनी मुलांच्या परीक्षा आदी कारणे पुढे केल्याने आता २ ते ६ मे अशी दौºयाची तारीख निश्चित केली आहे.
या दौºयासाठी येण्यास इच्छुक असणाºया नगरसेवकांकडून सचिव कार्यालयाने संमती पत्रे मागवली आहेत. ज्यांना दौºयाला यायचे आहे त्यांनी होय वा यायचे नसल्यास नाही म्हणून लेखी स्वरुपात पत्र द्यायचे आहे. आतापर्यंत ३५ नगरसेवकांनी लेखी पत्र देऊन कूर्ग येथील दौºयाला येणार असल्याची संमती दिली आहे असे सूत्रांनी सांगितले.
नगरसेवक हे विमानाने मेंगलोर येथे जातील. कूर्ग येथे ३ रात्र तर उडपी येथे एक रात्र असा या नगरसेवकांचा मुक्काम असेल. नगरसेवक पर्यटनाची मजा लुटणार आहेत. गोल्डन टेम्पल म्हणून ओळखले जाणारे नमुद्रलिंग मठ, कुशलनगर येथील एलिफंट दुबारे, नागरहोल राष्ट्रीय उद्यान, कावेरी नदीच्या उगमस्थानी असलेले तालकावेरी आदी विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना नगरसेवक भेटी देतील. अलिशान तारांकीत हॉटेलमध्ये ते राहणार आहेत. नगरसेवक अभ्यास दौºयाच्यानावाखाली मजेसाठी जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

केवळ एक दिवस उडपी पालिकेला भेट

तीन रात्र व चार दिवस कूर्ग या पर्यटनस्थळी नागरिकांच्या पैशांमधून पर्यटनाचा आनंद लुटतील. तर फक्त एक दिवस उडपी महापालिकेला भेट देतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे या आधीही अभ्यास दौºयाच्या नावाखाली नगरसेवक व अधिकाºयांनी देशभरातील विविध पर्यटनस्थळांना भेटी नागरिकांच्या पैशातून मजा केली आहे. अगदी काही अन्य पर्याय शोधून परदेश दौरेही केले आहेत.

Web Title:  Fill the bag ... Get out! Mira-Bhairinder's corporator went out to tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.